Surya-Shani Yuti: १२ महिन्यानंतर सूर्य-शनि येणार आमने-सामने! 'या' राशींना नुकसानाची शक्यता, राहा सतर्क-surya shani samsaptak yog these signs will be troubled ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya-Shani Yuti: १२ महिन्यानंतर सूर्य-शनि येणार आमने-सामने! 'या' राशींना नुकसानाची शक्यता, राहा सतर्क

Surya-Shani Yuti: १२ महिन्यानंतर सूर्य-शनि येणार आमने-सामने! 'या' राशींना नुकसानाची शक्यता, राहा सतर्क

Aug 09, 2024 02:38 PM IST

Surya-Shani Samsaptak Yog: ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि यांच्यात पिता आणि पुत्राचे संबंध आहेत. परंतु तरी ते एकमेकांचे शत्रू मानले जातात.

Surya-Shani Samsaptak Yog
Surya-Shani Samsaptak Yog

Surya-Shani Samsaptak Yog:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. या संक्रमणानंतर सूर्य आणि शनीच्या दरम्यान 'समसप्तक योग' तयार होईल. या काळात कुंभ राशीमध्ये स्थित शनि आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या घरात असतील आणि एकमेकांपासून १८० अंशांवर असतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि यांच्यात पिता आणि पुत्राचे संबंध आहेत. परंतु तरी ते एकमेकांचे शत्रू मानले जातात. या स्थितीत सूर्य आणि शनीच्या समसप्तक योगाच्या अशुभ प्रभावामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात. अशा लोकांनी सावध राहण्याची शक्यता आहे. शनि आणि सूर्याच्या आमने-सामने येण्याने कोणत्या राशींना नुकसान होऊ शकते ते पाहूया.

सिंह-

लवकरच सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यादरम्यान सूर्य आणि शनीमध्ये समसप्तक योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही काम विचारपूर्वक करावे. प्रेमसंबंधांमध्ये तुमचे मन दुखावण्याची शक्यता आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते बिघडू शकते. करिअरच्या दृष्टीनेही हा कालावधी तुमच्यासाठी योग्य नाही. शिवाय याकाळात ऑफिसमधील इतर लोकांशी तुमचे संबंध खराब राहतील. त्यामुळे महत्वाच्या कामात कोणीही तुमची साथ देणार नाही. परंतु तुम्हाला संयम ठेऊन वाटचाल करावी लागेल.

कन्या-

शनि आणि सूर्याच्या समसप्तक योगाचा अशुभ प्रभाव कन्या राशीवर पडणार आहे. याकाळात तुम्हाला विविध अडचणी येतील. महत्वाची कार्ये रखडतील. कार्यक्षेत्रात विशेष प्रगती होणार नाही. याकाळात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणे शक्यतो टाळा. विनाकारन खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे अगदी हात सांभाळून खर्च करा. कामाच्या व्यापात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वादविवाद होतील. आयुष्यात नकारात्मकता वाढेल. त्यामुळे स्वतःच्या मनावर ताबा ठेऊन कार्य करा.

वृश्चिक-

सूर्य आणि शनीचा समसप्तक योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात चिंता आणि समस्या वाढवणारा मानला जात आहे. तुमच्या चालू असलेल्या कामात अचानक अडथळे येऊ शकतात आणि तुमचे काम अडकून पडेल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीत तुमच्यावर काही प्रकारचे आरोप होऊ शकतात आणि तुमची प्रतिमा डागाळू शकते. नोकरदार लोकांनी यावेळी आपले काम अतिशय काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा इतर लोक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकतात. वैवाहिक आयुष्यातसुद्धा वादविवाद होण्याची शक्यता आहे.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

विभाग