Sun Nakshatra Transit 2024 : ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. प्रत्येक ग्रह आपआपल्या कालावधी प्रमाणे राशी आणि नक्षत्र बदलतात.
जुलै महिन्याचा शेवटी सूर्य काही राशींवर विशेष कृपा करणार आहे. आत्म्याचा कारक आणि ग्रहांचा राजा सूर्य सध्या कर्क राशीत आहे. १५ ऑगस्टपर्यंत सूर्य या राशीत राहील. दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य राशीच्या बदलाबरोबरच नक्षत्रही बदलतो. १९ जुलै रोजी सूर्याने शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. ०२ ऑगस्टपर्यंत सूर्य या नक्षत्रात राहील. २ ऑगस्ट रोजी सूर्य रात्री १० वाजून १५ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. जाणून घ्या सूर्याच्या राशीतील बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल तर काही राशीच्या लोकांना नुकसान होईल-
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीमध्ये सूर्य उच्च आहे. मेष राशीच्या लोकांना सूर्य राशीतील बदलाचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. सूर्य सध्या या राशीत भ्रमण करत आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य नक्षत्रातील बदल खूप शुभ असणार आहे. तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य भ्रमण वरदानापेक्षा कमी नाही. सूर्यदेवाच्या कृपेने या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ असेल. गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर असणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भ्रमण खूप फायदेशीर असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
सूर्य राशीतील बदलाचा बहुतेक राशींवर शुभ प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशी आहेत ज्यांना या काळात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. मीन, सिंह, धनु आणि वृषभ राशीच्या लोकांनी सूर्य नक्षत्राच्या संक्रमणादरम्यान सावध राहावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या