ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थान बदलांचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो. काही वेळा हा परिणाम शुभ असतो तर काही वेळा अशुभ असतो. ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या स्थानात बदल करत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. सध्या सूर्याच्या संक्रमणाने राशींमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. १४ मे २०२४ रोजी सूर्य वृषभ राशीत पोहोचताच आणखी एक बदल घडून येणार आहे. यावेळी सूर्य शनीच्या तिसऱ्या राशीपासून दूर जाईल. त्यामुळे त्यांना अधिक शुभ परिणाम पाहायला मिळतील. सध्या सूर्य मेष राशीत विराजमान आहे.अशा परिस्थितीत कुंभ राशीत बसलेला शनि सूर्यावर तिसरा दृष्टिक्षेप टाकत आहे. त्यामुळे उच्चस्थानी असलेला सूर्य फलदायी प्रभाव देण्यास कमी पडत आहे. दुसरीकडे सूर्य-गुरू संयोगाचा प्रभाव काही लोकांवर इतका प्रभावी असेल की त्यांना अगदी शून्यातून विश्व निर्माण केल्याचा अनुभव घेता येईल.
१४ मे २०२४ हा दिवस सर्वार्थाने अतिशय शुभ असणार आहे. या दिवशी अनेक शुभ योग एकत्र जुळून येत आहेत. या दिवशी वैशाख महिना, शुक्ल पक्ष, गंगा सप्तमी तिथी, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र यासोबतच वृषभ संक्रांती देखील आहे. या दिवशी सूर्य शनी ग्रहापासून दूर होत गुरु राशीसोबत युती करणार आहे. ज्यावेळी सूर्य राशीपरिवर्तन करत वृषभ राशीत संक्रमण करेल त्यावेळी गुरु आधीपासून तिथे विराजमान असणार आहे. त्यामुळे आपसूकच त्यांची युती पाहायला मिळणार आहे. या सर्व शुभ योगांचा परिणाम राशीचक्रातील काही राशींवर अतिशय फायदेशीर असणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
येत्या १४ मे रोजी याच राशीमध्ये सूर्य आणि गुरु एकत्र येणार आहेत. त्यामुळे या राशीला सूर्य-गुरुच्या संयोगाचा मोठा फायदा होणार आहे. या राशीतील लोकांना जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. आरोग्य सुधारुन शरिरात नवी ऊर्जा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळून पगारवाढ होईल. विरोधक तुम्हाला ईजा पोहोचवण्यात अपयशी ठरतील. व्यावसायिकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे.
सूर्य-गुरुच्या युतीचा सिंह राशीवरसुद्धा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती सुधारेल. पैसे येण्याचे मार्ग वाढतील मात्र खर्च कमी होईल. त्यामुळे पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचा आता फायदा मिळू शकतो. अनपेक्षित धनलाभ झाल्याने उत्साह वाढेल. नोकरदार वर्गाला प्रगतीसाठी उत्तम काळ आहे. याकाळात नवा व्यवसाय सुरु केल्यास फायदेशीर ठरेल. व्यवसायचा चांगला जम बसेल.
वृषभ आणि सिंह राशीप्रमाणेच कन्या राशीलासुद्धा या युतीचा सकारात्मक फायदा होणार आहे. सूर्य-गुरुच्या युतीच्या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतात. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. लग्नसाठी इच्छुक असणाऱ्यांचे विवाह जुळून येऊ शकतात. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. सोबतच घरात एखादे धार्मिक कार्य करण्याची योजना बनू शकते. काही लोक चारधाम यात्रेसाठी रवाना होऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीसुद्धा हा काळ अतिशय उपयुक्त सिद्ध होणार आहे. अविवाहित लोकांचे विवाह जुळून येतील. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. अनपेक्षित मार्गाने अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढीस लागेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. तसेच जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल.
संबंधित बातम्या