हिंदू धर्मात ग्रहणला विशेष महत्व आहे. ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. मात्र या घटनेला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्वसुद्धा प्राप्त आहे. वर्षातील पहिले ग्रहण एप्रिल महिन्यात लागले होते. त्यानंतर आता वर्षातील दुसरे ग्रहण आक्टोबर महिन्यात होणार आहे. हा दुसरा सूर्यग्रहण अत्यंत खास असणार आहे. कारण हा ग्रहण तब्बल ६ तास ४ मिनिटापर्यंत असणार आहे. ज्योतिषीय अभ्यासानुसार सूर्यग्रहणाच्या दरम्यान ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानामध्ये महत्वाचे बदल घडून येतात. शास्त्रानुसार जेव्हा राहू आणि केतू सूर्यासोबत एकाच राशीत विराजमान होतात, तेव्हा ग्रहण योगाची निर्मिती होते. दुसऱ्या सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र याचा परिणाम जगभरात पाहायला मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार दुसरा सूर्यग्रहण भारतीय तारखेनुसार २ ऑक्टोबर रोजी असणार आहे. यादिवशी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सूर्यग्रहण प्रारंभ होणार आहे. तर रात्री उशिरा ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार आहे. हे सूर्यग्रहण आश्विन मासातील अमावस्येला म्हणजेच सर्वपितृ अमावस्येच्या तिथीला होणार आहे. शिवाय हे ग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात असणार आहे. यादिवशी सूर्यासोबत चंद्र, बुध आणि केतू विराजमान असणार आहेत. शिवाय बृहस्पतीदेव गुरु आणि ग्रहांचा सेनापती मंगळचीसुद्धा शुभ दृष्टी असणार आहे. तर दुसरीकडे सूर्यापासून दुसऱ्या घरात शुक्र आणि सहाव्या घरात वक्री झालेले शनिदेव स्थित असणार आहेत.
दुसऱ्या सूर्यग्रहणाचा लाभ मिथुन राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे अचानक पूर्ण होतील. कन्या राशीत सूर्यासोबत केतू विराजमान असल्याने त्याचाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुमच्या कामात प्रचंड सुधारणा होईल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. नव्या लोकांची ओळख होऊन मैत्री वाढेल.
कर्क राशीच्या लोंकाना दुसऱ्या सूर्य ग्रहणाचा विशेष फायदा होणार आहे. याकाळात तुम्हाला प्रचंड भौतिक सुख प्राप्त होतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेले मतभेद संपुष्ठात येतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमच्या ध्येयाची प्राप्ती होईल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. हे सकारात्मक बदल तुम्हाला आवडतील.
दुसऱ्या सूर्यग्रहणाचा वृश्चिक राशीच्या लोकांसुद्धा लाभ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे याकाळात परत मिळतील. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांचे उच्च अधिकऱ्यांसोबत चांगले संबंध बनतील. त्यातून भविष्यात निश्चितच लाभ मिळणार आहे. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)