Surya Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीत आपले स्थान बदलत असतात. त्या ठराविक कालावधीतच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. या प्रक्रियेलाच गोचर असे म्हटले जाते. सध्या जुलै महिना सुरू आहे. या महिन्यात पहिल्याच आठवड्यापासून अनेक मोठमोठे ग्रह गोचर करत आहेत. ग्रहांच्या या गोचरमधून विविध शुभ-अशुभ योग घटित होत आहेत. या योगांचा पूर्ण प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत आहे. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात अनपेक्षित सकारात्मक-नकारात्मक बदल घडून येत आहेत.
दरम्यान आता ग्रहांचा राजा सूर्य आपली राशी बदलणार आहे. येत्या १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याला राशी परिवर्तनासाठी जवळपास २९ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. अर्थातच सूर्य दर महिन्याला गोचर करत असतो. सूर्याच्या कर्क राशीत गोचरने षडाष्टक नावाचा योग निर्माण होत आहे. सूर्याच्या शनिसोबत संयोगातून या योगाची निर्मिती होत आहे. हा योग काही राशींसाठी अशुभ समजला जात आहे. या योगाचा नकारात्मक परिणाम राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. त्यामुळे त्यांना दक्षता घेण्याचा सल्ला शास्त्रात देण्यात आला आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.
षडाष्टक योगाचा नकारात्मक परिणाम कर्क राशीच्या लोकांवर होणार आहे. याकाळात तुम्हाला काळजीपूर्वक वर्तन करावे लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अथवा जुनाट आजार त्रास देतील. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. पैशांचे व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. नाहीतर जवळच्या व्यक्तींसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. मानसिक आरोग्य जपा. याकाळात होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा.
सूर्याच्या कर्क राशीत गोचरने निर्माण होणाऱ्या षडाष्टक योगाचा नकारात्मक प्रभाव सिंह राशीच्या लोकांवरसुद्धा पडणार आहे. याकाळात तुमच्या अडचणी वाढतील. हातातील महत्वाची कामे रखडतील. आर्थिक आवक कमी झाल्याने आर्थिक चणचण भासेल. शासकीय कामे काळजीपूर्वक हाताळा. नाहीतर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. षडाष्टक योगात नव्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या. अथवा नुकसानाला सामोरे जावे लागेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मतभेद होऊन तणाव येण्याची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांना षडाष्टक योगात त्रास सहन करावा लागणार आहे. याकाळात तुम्हाला कार्यक्षेत्रात विरोधकांचा त्रास जाणवेल. विरोधकांच्या चालींमुळे तणाव वाढेल. कामात सतत अडचणी येतील. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, अथवा वाद होण्याची दाट शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या नाहीतर जुने आजार त्रासदायक ठरतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी खानपानाच्या सवयींकडे लक्ष द्या. घरातील सदस्यांसोबत वादविवाद करणे टाळा. त्यातून मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या