Surya Gochar : नवरात्रीनंतर सूर्याचे गोचर; मानवी जीवनावर कसा होईल परिणाम, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Gochar : नवरात्रीनंतर सूर्याचे गोचर; मानवी जीवनावर कसा होईल परिणाम, जाणून घ्या

Surya Gochar : नवरात्रीनंतर सूर्याचे गोचर; मानवी जीवनावर कसा होईल परिणाम, जाणून घ्या

Updated Oct 03, 2024 12:55 PM IST

Sun Transit In Libra 2024 : सूर्य एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीनंतर सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या सूर्याचे तूळ राशीत होणारे संक्रमण लोकांच्या मनावर काय परिणाम करेल-

सूर्याचे राशीपरिवर्तन २०२४
सूर्याचे राशीपरिवर्तन २०२४

Surya Gochar 2024 October Horoscope : प्रत्येक महिन्यात व्रत-वैकल्य असतात. तसेच आपल्या कालावधीनुसार प्रत्येक ग्रह आपली राशी बदलतात. ग्रहांचे गोचर ज्योतिषशास्त्रात महत्वाचे मानले जाते. प्रत्येक ग्रहाच्या राशी आणि नक्षत्र बदलाचा राशीचक्रातील सर्व राशीवर म्हणजेच मानवी जीवनावर परिणाम होतो. काही राशीच्या लोकांचा शुभ काळ सुरू होतो, तर काही राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरू होतो. ऑक्टोबर महिन्यातही काही ग्रहांचे गोचर होईल.

सूर्य, ग्रहांचा राजकुमार, एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. सूर्य सध्या कन्या राशीत भ्रमण करत असून, नवरात्रीनंतर तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीत सूर्य दुर्बल होईल. नवरात्री ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत चालेल. गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी सूर्याचे तूळ राशीत भ्रमण होईल. तूळ राशीतील सूर्याचे संक्रमण देश आणि जगावर तसेच मानवी जीवनावर परिणाम करेल. ज्योतिषीय गणनेनुसार सूर्याचे तूळ राशीत होणारे संक्रमण लोकांसाठी शुभ नसेल.

सूर्याच्या तूळ राशीतून होणारे परिणाम जाणून घ्या -

ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्यानुसार सूर्य १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच दुर्बल अवस्थेत जाईल. अशा परिस्थितीत सूर्याच्या प्रभावामुळे लोकांची ऊर्जा पातळी कमी होईल. हाडे किंवा त्वचेशी संबंधित आजारांमुळे त्रास होऊ शकतो. आर्थिक जीवनात चढ-उतार येतील. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामात अडथळे येऊ शकतात. एकंदरीत सूर्य ग्रहाचे हे संक्रमण आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून शुभ दिसत नाही. या काळात सूर्याला जल अर्पण करणे सर्व राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

सूर्य तूळ राशीमध्ये किती काळ राहील - 

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य कोणत्याही राशीत सुमारे एक महिना भ्रमण करतो. अशा स्थितीत सूर्य १५ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहील आणि १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

तूळ राशी आहे सूर्याची शत्रू राशी - 

ज्योतिषशास्त्र सांगते की, तूळ राशीत सूर्य कमकुवत वाटतो आणि शत्रू राशी असल्याने सकारात्मक परिणाम देऊ शकत नाही.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner