Surya Gochar : सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; या ३ राशीच्या लोकांचे नशीब फळणार, पदोन्नती होणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Gochar : सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; या ३ राशीच्या लोकांचे नशीब फळणार, पदोन्नती होणार

Surya Gochar : सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; या ३ राशीच्या लोकांचे नशीब फळणार, पदोन्नती होणार

Nov 07, 2024 10:58 AM IST

Surya Gochar In Vishakha Nakshatra : सूर्याने गुरु ग्रहाच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन झाले आहे. जाणून घेऊया या गोचरमुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम होईल.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन

ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन राशीचक्रातील १२ राशींवर परिणामी ठरते. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार परिवर्तन करतो. ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होतो.

सूर्य सध्या तूळ राशीत आहे. सूर्य तूळ राशीत असताना आता नक्षत्र परिवर्तनही करणार आहे. सूर्याने गुरु ग्रहाच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन काही राशींना भाग्यदायक ठरणार आहे. विशाखा नक्षत्र हे गुरूचे नक्षत्र असून, विशाखा नक्षत्राचा तूळ आणि वृश्चिक राशीची चांगला संबध निर्माण करते. गुरूच्या नक्षत्रात सूर्याच्या जाण्याने अनेक राशींवर शुभ परिणाम होणार आहे. पूर्वी सूर्य स्वाती नक्षत्रात होता आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा सूर्य नक्षत्र बदलेल. जाणून घेऊया कोणत्या राशींवर काय परिणाम होईल.

सूर्याचा मेष, तूळ आणि वृश्चिक राशीवर शुभ परिणाम होईल

सूर्याच्या नक्षत्र बदलाचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. विशेषतः तीन राशींना याचा सर्वाधिक फटका बसणार असून, त्यापैकी मेष, वृश्चिक आणि तूळ या राशी आहेत. कारण सूर्य सध्या तूळ राशीत आहे आणि ज्या नक्षत्रात सूर्य जात आहे, त्या नक्षत्राचाही तूळ राशीशी संबंध आहे. या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला सन्मान दिला जाईल. कुटुंबात ही तुमचा मान-सन्मान होईल. वडिलांशी असलेले मतभेद दूर होतील. 

मेष राशीच्या लोकांचे आरोग्य सुदृढ होईल, जुना एखादा आजार असेल तर तो दूर होईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. लाभाच्या अनेक संधी मिळतील.

वृश्चिक राशीच्या लोकांना ही अनेक प्रकारे चांगले परिणाम मिळतील, विशेषत: नोकरीत तुम्हाला पदोन्नती आणि नवीन ठिकाणी स्थानांतरित होण्याचे योग आहेत. आपल्या नेतृत्व गुणवत्तेमुळे तुम्हाला हा फायदा होईल. परंतु हा प्रभाव फार कमी काळासाठी असेल, कारण नोव्हेंबरमध्ये सूर्य पुन्हा नक्षत्र बदल आणि राशी बदल करत आहे.

नोव्हेंबर मध्ये सूर्य राशीही बदलत आहे. सूर्य १६ नोव्हेंबरला तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्य हा नेतृत्व क्षमता, आत्मा, पिता इत्यादींचा कारक मानला जातो.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner