Surya Gochar : अनुराधा नक्षत्रात सूर्य गोचर; या ५ राशींसाठी २ डिसेंबरपर्यंतचा काळ शुभ, गुंतवणुकीवर मिळेल चांगला परतावा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Gochar : अनुराधा नक्षत्रात सूर्य गोचर; या ५ राशींसाठी २ डिसेंबरपर्यंतचा काळ शुभ, गुंतवणुकीवर मिळेल चांगला परतावा

Surya Gochar : अनुराधा नक्षत्रात सूर्य गोचर; या ५ राशींसाठी २ डिसेंबरपर्यंतचा काळ शुभ, गुंतवणुकीवर मिळेल चांगला परतावा

Nov 19, 2024 11:01 PM IST

अनुराधा नक्षत्रात सूर्याचे संक्रमण नोव्हेंबर २०२४ : मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी सूर्याने अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. अनुराधा नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे काही राशींना प्रचंड फायदा होईल, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन

Surya Gochar In Anuradha Nakshatra 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रहांचा बदल राशीचक्रातील राशींवर परिणामी ठरतो, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होतात तर काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागते. 

ग्रहांचा राजा सूर्य एका विशिष्ट कालावधीत राशी बदलतो, सध्या सूर्य वृश्चिक राशीत विराजमान आहे. सूर्य ग्रह राशी संक्रमण करतो त्याचप्रमाणे आपले नक्षत्रही बदलतो. मंगळवार, १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सूर्याने अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. २ डिसेंबरपर्यंत सूर्य या नक्षत्रात राहील. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे. शनी आणि रवी यांच्यात पुत्र-पित्याचे नाते आहे. पुत्र शनीच्या नक्षत्रात पिता सूर्याचे आगमन झाल्याने काही राशींना लाभदायक परिणाम मिळतील, तर काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. सूर्य नक्षत्र संक्रमणाच्या प्रभावामुळे काही राशींना आकस्मिक धनलाभ होईल आणि व्यवसायात वाढ होईल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मेष - 

मेष राशीच्या लोकांचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. नोकरी-व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. कठोर परिश्रमाने आपण आपल्या कार्यात यश मिळवू शकाल. आर्थिक लाभ होईल.

मिथुन - 

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य नक्षत्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल. जीवनात आर्थिक प्रगती होऊ शकते. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळू शकतात. तब्येतीत सुधारणा होईल. प्रवासाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या - 

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. अवघड कामांमध्ये यश मिळेल.

धनु - 

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य नक्षत्राचे संक्रमण शुभ राहील. विरोधकांवर विजय मिळवाल. न्यायालयात विजय मिळवाल. करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कार्यक्षेत्रात मोठे यश मिळू शकते.

मीन - 

मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रस वाटेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ निर्माण होत आहे.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner