वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या गोचराचा परिणाम राशीचक्रातील मेष ते मीन सर्व १२ राशींवर होतो. नोव्हेंबरमध्ये देव दिवाळीनंतर सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्य शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. यानंतर १५ डिसेंबरला सूर्य धनु राशीत संक्रमण करेल.
सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि बुधासोबत बुधादित्य राजयोग तयार होईल. सूर्य संक्रमणाच्या प्रभावामुळे अनेक राशींचे लोक भाग्यवान ठरतील. संक्रमणादरम्यान सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये समसप्तक योगही तयार होत आहे. तसेच यावेळी वेशी योग देखील प्रभावी होईल. या गोचरच्या शुभ प्रभावामुळे काही राशींना वर्षाच्या अखेरीस आर्थिक प्रगती साधता येईल.
वृश्चिक राशीत गेल्यानंतर सूर्य बुधाशी युती करेल. रवि आणि बुध यांच्या युतीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल. बुध-रवि ची युती ४ राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या या राशींविषयी-
तूळ राशीच्या लोकांवर रवि आणि बुधयांच्या युतीचा खूप शुभ परिणाम होईल. या काळात पैशांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. करिअरमध्ये पदोन्नती मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
सूर्य वृश्चिक राशीतच प्रवेश करत आहे. रवि आणि बुध यांच्या युतीचा वृश्चिक राशीच्या व्यापाऱ्यांना फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. शारीरिक समस्यांपासून आराम मिळेल.
बुध आणि रवि यांची युती मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात जमीन, इमारत आणि वाहन खरेदीचे योग आहेत. पालकांच्या पाठिंब्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ निर्माण होत आहे.
वृश्चिक राशीत रवि आणि बुध यांच्या युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. नोकरीत पदोन्नती किंवा उत्पन्नवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या जातकांना चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक भरभराट होईल आणि मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)