सूर्य संक्रमणामुळे विविध महत्वाचे योग जुळून येत असतात. यंदा सूर्य संक्रमणामुळे तब्बल १२ वर्षांनंतर सूर्य आणि गुरु यांचा संयोग जुळून येत आहे. १४ मे रोजी सूर्य वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तत्पूर्वी गुरु आधीच वृषभ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे १२ वर्षांनी सूर्य आणि गुरुची युती पाहायला ,मिळणार आहे. या युतीमुळे गुरुआदित्य हा शुभ योग घटित होणार आहे. या योगामुळे राशीचक्रातील पाच राशींचे नशीब उघडणार आहे. पाहूया या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत.
गुरुआदित्य या शुभ योगामुळे मेष राशीलासुद्धा फायदा होणार आहे. १४ मे नंतर मेष राशीचे नशीब चमकणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. ऑफिसमधील कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांवर कामाचा प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. अचानक अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होईल. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंबातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात यश मिळेल. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने संवाद साधला जाईल. त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. नाते आणखी दृढ होईल.
वृषभ राशीमध्ये सूर्याचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या योगामुळे करिअर एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. व्यवसायिकांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होईल. जोडीदारासोबत संवाद साधून तुम्हाला समाधान लाभेल. एकमेकांमध्ये समंजस वृत्ती निर्माण होऊन नाते अधिक मजबूत होईल. आरोग्यच्या दृष्टीने काळ उत्तम आहे. शारीरिकदृष्ट्या निरोगी राहिल्याने मनही उत्साहित राहील. पचनक्रिया आधीपेक्षा चांगली झाल्याचे दिसून येईल.
मेष आणि कर्क राशीप्रमाणेच सिंह राशीसाठीसुद्धा गुरुआदित्य योग शुभ ठरणार आहे. गुरु संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यावर शुभ प्रभाव पडून तुमचा मानसन्मान वाढेल. महत्वाच्या कार्यसाठी आखलेली योजना पूर्णत्वास जाईल. योजनेचे तोंडभरुन कौतुक होईल. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकून असलेले पैसे अचानक परत मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. जुन्या आजरांपासून मुक्ती मिळेल. स्वास्थ्य सुधारेल. फिटनेसवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कराल.
वृश्चिक राशीच्या लोकांना गुरुआदित्य योग फलदायी ठरणार आहे. हा योग वृश्चिक राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली उभारी देणारा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात कमाईचे नवे मार्ग खुले होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या धावपळीत थकवा जाणवू शकतो. नव्याने सुरु केलेल्या कार्यात यश मिळेल.
तब्बल १२ वर्षांनंतर जुळून येत असलेली सूर्य आणि गुरुची युती मीन राशीसाठी शुभ ठरणार आहे. या स्थितीत व्यावसायिकांना जबरदस्त लाभ होईल. जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून आता फायदा मिळू शकतो. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे. मुलांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करताना पाहून तुम्हाला मानसिक आनंद मिळेल. कार्यक्षेत्रात अनेक चांगल्या संधी मिळतील.