मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Gochar : १२ महिन्यांनंतर सूर्यदेव करणार स्वराशीत संक्रमण! 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

Surya Gochar : १२ महिन्यांनंतर सूर्यदेव करणार स्वराशीत संक्रमण! 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

Jun 26, 2024 03:04 PM IST

Sun Transit Impact On Zodiac Signs : सूर्य लवकरच राशी परिवर्तन करत आपल्या स्वराशी असणाऱ्या सिंह राशीत संक्रमण करणार आहे. जाणून घ्या सूर्याचे राशीपरिवर्तन राशींवर कसे प्रभावी ठरेल.

सूर्याचे राशीपरिवर्तन, सूर्य संक्रमण
सूर्याचे राशीपरिवर्तन, सूर्य संक्रमण

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होतो. त्यामुळेच ग्रहांच्या हालचाली अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. ग्रह स्थान बदलतात म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यालाच गोचर किंवा संक्रमण म्हणतात. ग्रहांच्या गोचरने अनेक शुभ-अशुभ योग जुळून येतात. जे काही राशींसाठी अतिशय फायद्याचे असतात तर काही राशींसाठी अतिशय नुकसानीचे असतात.

वैदिक शास्त्रात तब्बल नऊ ग्रह स्थित आहेत. हे ग्रह राशींवर प्रभाव टाकत असतात. या ग्रहांचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. सूर्य लवकरच राशी परिवर्तन करत आपल्या स्वराशी असणाऱ्या सिंह राशीत संक्रमण करणार आहे. तब्बल १२ महिन्यानंतर म्हणजेच १ वर्षांनी सूर्याचे स्वत:च्या राशीत संक्रमण होणार आहे. या सूर्य गोचरने काही राशींना अतिशय लाभ मिळणार आहे. या राशींसाठी अक्षरशः सुवर्णकाळ सुरु होणार आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

सिंह

सूर्य सिंह राशीतच प्रवेश करणार आहे. त्यामुळे या संक्रमणाचा विशेष लाभ सिंह राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. वास्तविक या राशीला दुहेरी लाभ मिळणार आहे. कारण सूर्य या राशीचा स्वामी ग्रह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राशीत लग्न भावावर भ्रमण करणार आहे. याकाळात समाजात तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. पूर्वीपेक्षा दुप्पट आत्मविश्वास निर्माण होईल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रसिद्धी मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत होईल. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या करिअरवर होईल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. शिवाय अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

धनु

सूर्यदेवाच्या स्वराशीत प्रवेशाने धनु राशीच्या लोकांनासुद्धा फायदा होणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. अनपेक्षितपणे धनलाभ होतील. हातात पैसे आल्याने मन प्रसन्न राहील. कामानिमित्त परदेशी प्रवासाचा योग जुळून येईल. जोडीदारासोबत संबंध अधिक मजबूत होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणाला भेट देऊ शकता.

कर्क

सिंह आणि धनु राशीप्रमाणेच कर्क राशीलासुद्धा सूर्य गोचरचा उत्तम लाभ मिळणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव इतरांवर पडणार आहे. कामातून धनलाभ होईल. उद्योग-व्यवस्यात आर्थिक लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास फायदाच होईल. मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील. त्यातून आर्थिक स्थिती भक्कम होईल.

WhatsApp channel