ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. सूर्यसुद्धा एका ठराविक वेळेतच राशीपरिवर्तन करत गोचर करत असतात. शास्त्रानुसार सूर्य राशी परिवर्तन करण्यासाठी तब्बल १ महिन्याचा कालावधी घेतो. सूर्य राशीसोबतच नक्षत्र परिवर्तनदेखील करत असतो. सूर्य नक्षत्र परिवर्तनासाठी १५ दिवसांचा कालावधी घेतो. सध्या सूर्य पुनर्वसू नक्षत्रात विराजमान आहे. तर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच १९ जुलै २०२४ रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शनिमध्ये पितापुत्राचे संबंध असतात. शास्त्रानुसार पिता असलेले सूर्यदेव पुत्र शनिदेवाच्या नक्षत्रात गोचर करणार आहेत. या गोचरचा काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, सूर्य १९ जुलै २०२४ रोजी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी पुष्य नक्षत्रात गोचर करेल. सूर्य या नक्षत्रात येत्या २ ऑगस्टपर्यंत विराजमान असणार आहे. शास्त्रात एकूण २७ नक्षत्रे कार्यरत आहेत. या नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र सर्वात श्रेष्ठ समजले जाते. या नक्षत्राला सर्वात शुभ नक्षत्राचा दर्जा आहे. त्यामुळेच सूर्याचे या नक्षत्रात विराजमान होणे लाभदायक असणार आहे. राशीचक्रातील काही राशींना यांचा प्रचंड लाभ मिळणार आहे. पाहूया त्या राशी कोणत्या आहे.
सूर्याचे पुष्य नक्षत्रात गोचर या राशीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. याकाळात विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. शिवाय तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे. ऐषोरामी आयुष्य जगण्याकडे तुमचा कल राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कार्यावर खुश होतील. याकाळात तुम्हाला बढती किंवा अप्रेजल मिळू शकते. उद्योग-व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल.
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळेच सूर्याचे पुष्य नक्षत्रात गोचर सिंह राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याकाळात तुम्हाला व्यापार विस्तारण्याची संधी मिळेल. कामानिमीत्त विदेश दौरा घडून येईल. विदेशात व्यापार असलेल्यांना विशेष फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे याकाळात परत मिळतील. व्यवसायनिमित्त विविध ठिकाणी येणे-जाणे होईल. त्यातूनही प्रचंड लाभ होईल. शिवाय वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा सूर्याच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करण्याचा लाभ मिळणार आहे. याकाळात धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. हातातून एखादे धार्मिक कार्य घडून येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना याकाळात चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. शिवाय इतर नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये प्रगती झालेली दिसून येईल. व्यापाऱ्यांना एखादी मोठी डील पदरात पाडण्यात यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्याच्या तक्रारी याकाळात दूर होतील. उत्तम स्वास्थ्य लाभेल. त्यामुळे मन उत्साही राहील.
संबंधित बातम्या