Samsaptak Yog : ३० वर्षांनी पिता-पुत्राचा असा संयोग; समसप्तक योगाचा १२ राशींवर कसा राहील प्रभाव, वाचा-surya gochar 2024 sun and saturn samsaptak yog impact on all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Samsaptak Yog : ३० वर्षांनी पिता-पुत्राचा असा संयोग; समसप्तक योगाचा १२ राशींवर कसा राहील प्रभाव, वाचा

Samsaptak Yog : ३० वर्षांनी पिता-पुत्राचा असा संयोग; समसप्तक योगाचा १२ राशींवर कसा राहील प्रभाव, वाचा

Aug 20, 2024 11:28 AM IST

Surya Shani Samsaptak Yog : शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी सूर्याने ७ वाजून ५३ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील. कुंभ राशीमध्ये शनि पूर्वगामी अवस्थेत आधीच भ्रमण करत आहे. वाचा, या संक्रमणाचा सर्व राशींवर कसा प्रभाव राहील.

सूर्य शनि समसप्तक योग
सूर्य शनि समसप्तक योग (Pixabay)

शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी सूर्याने ७ वाजून ५३ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील. कुंभ राशीमध्ये शनि पूर्वगामी अवस्थेत आधीच भ्रमण करत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनि यांच्यात समसप्तक योग निर्माण झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत समसप्तक योग राहील, विशेष म्हणजे सूर्य आणि शनि या दोघं पिता-पुत्रांनी आपापल्या राशीत संक्रमण करताना समसप्तक योग तयार केला आहे. बारा राशींवर या योगाचा कसा प्रभाव राहील जाणून घ्या.

मेष : 

नवीन कामात भांडवली गुंतवणूक कराल. आर्थिक प्रगती होईल. परंतू निराशा पदरी पडेल. मुलांशी मतभेद होईल. अतिउत्साह टाळा.

वृषभ :

प्रलंबित कामे पूर्ण होतील. संघर्षाने प्रगती करा. जंगम मालमत्तेची खरेदी आणि विक्री करू शकतात. मुलांशी मतभेद होईल. निवासस्थान किंवा कामाचे ठिकाण बदलू शकते.

मिथुन :

कुटुंबात शुभ कार्य होईल. प्रलंबित कामे अतिरिक्त मेहनतीने पूर्ण होतील. काही नवीन जबाबदारी सोपवली जाईल. दुरुस्तीसाठी खर्च वाढेल.

कर्क :

चुकीचा निर्णय घ्याल. अल्प आर्थिक लाभ होऊ शकेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. संयम आणि दक्षता सर्व बाबतीत फायदेशीर आहे.

सिंह: 

भागीदारी आणि कौटुंबिक जीवनात काही संघर्ष होऊ शकतो. काही भूतकाळातील कृतींचे अप्रिय परिणाम होऊ शकतात. नवीन कामातून आर्थिक लाभ मिळेल. मान-प्रतिष्ठेची प्राप्ती होईल.

कन्या :

या योगाचा संमिश्र परिणाम होईल. काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. काही कामात निराशा येईल. निवासस्थान, कामाचे ठिकाण बदलणे योग्य ठरेल. नवीन कामात सहभागी व्हाल. काही जुने प्रश्न सुटतील आणि विरोधक पराभूत होतील.

तूळ :

व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होईल. नोकरीशी संबंधित लोकांसाठी संघर्ष राहील. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. 

वृश्चिक: 

कामाच्या ठिकाणी फायदेशीर बदल होतील, कामाचे स्वरूप बदलेल. आरोग्य सुदृढ होईल. जास्त खर्च होईल. महत्त्वाच्या कामात अतिरिक्त मेहनत घेऊन यश मिळेल.

धनु : 

चालू असलेल्या समस्येवर उपाय शोधावा लागेल. आर्थिक लाभ होईल. सन्मान आणि महत्त्वाच्या पदाची प्राप्ती होऊ शकते. भविष्यातील योजनांबाबत निर्णय घ्यावा लागेल.

मकर: 

भागीदारी आणि नातेसंबंधात मतभेद होऊ शकतात. खर्चाचा अतिरेक टाळा. आवेगपूर्ण निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान, चोरी, फसवणूक होण्याचीही शक्यता आहे.

कुंभ : 

आत्मविश्वास वाढेल. काही आरोग्य समस्यांवर उपाय सापडेल. नवीन नातेसंबंध, संपर्क किंवा भागीदार तयार होतील. दुरुस्तीचे काम आणि खरेदी कराल.

मीन : 

आरोग्याच्या समस्या आणि विरोधकांकडून त्रास होईल. कर्जाच्या काही व्यवहारांची पुर्तता होऊ शकते. अभ्यास आणि संशोधनाशी संबंधित लोकांसाठी शुभ काळ आहे. घाई टाळा आणि मतभेद टाळा.

विभाग