मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Raj Yog : १०० वर्षानंतर सूर्य बनवतोय शुक्रादित्य आणि बुधादित्य राजयोग! 'या' राशींची लागणार लॉटरी, मिळणार खुशखबर

Raj Yog : १०० वर्षानंतर सूर्य बनवतोय शुक्रादित्य आणि बुधादित्य राजयोग! 'या' राशींची लागणार लॉटरी, मिळणार खुशखबर

Jul 11, 2024 03:58 PM IST

Sukraditya and Budhaditya Raj Yog : १६ जुलै २०२४ रोजी सूर्य आपली राशी बदलणार आहे. यादिवशी सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे.

राजयोगाचा राशींवर प्रभाव, ग्रहांचा राशींवर प्रभाव
राजयोगाचा राशींवर प्रभाव, ग्रहांचा राशींवर प्रभाव

वैदिक शास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. त्यामुळेच सूर्याच्या स्थान बदलला विशेष महत्व असते. येत्या १६ जुलै २०२४ रोजी सूर्य आपली राशी बदलणार आहे. यादिवशी सूर्य कर्क राशीत गोचर करणार आहे. मात्र कर्क राशीत आधीपासूनच धन दाता शुक्र आणि व्यापार दाता बुध विराजमान आहेत. अशात सूर्याच्या प्रवेशाने राजयोगांची निर्मिती होणार आहे. हे राजयोग सूर्य एक-दोन नव्हे तब्बल १०० वर्षांनंतर बनवणार आहे. कर्क राशीत शुक्र आणि सूर्याच्या युतीने शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. तर बुध आणि सूर्याच्या युतीतून बुधादित्य योगाची निर्मिती होणार आहे. हे दोन्ही राजयोग राशीचक्रातील चार राशींसाठी अत्यंत शुभ लाभदायक ठरणार आहेत. या राजयोगामुळे त्या ४ राशींना चक्क लॉटरीच लागणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

कन्या

सूर्याच्या गोचरमधून निर्माण होणाऱ्या शुक्रादित्य आणि बुधादित्य योगाचा फायदा कन्या राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नोकरीत एखादी मोठी संधी प्राप्त होऊ शकते. उद्योग-व्यवसायात एखादी मोठी डील हाती लागेल. त्यातून चांगला आर्थिक फायदा होईल. पैशांची आवक वाढेल. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. घरामध्ये भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. शिवाय एखादी नवी प्रॉपर्टी खरेदी कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. घरात सुखसमृद्धी नांदेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनासुद्धा सूर्य गोचरमधून निर्माण होणाऱ्या राजयोगांचा लाभ मिळणार आहे. याकाळात व्यवस्यात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसून येईल. या राजयोगात तुम्हाला नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. यामध्ये तुम्हाला बढती आणि पगारवाढ दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. करिअरच्या दृष्टिकोनातून बुधादित्य योग तुम्हाला प्रचंड लाभदायक ठरणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोगांचा फायदा होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धेत यश मिळेल. शुक्रादित्य राजयोगाने धनसंपत्ती वाढेल. मिळकतीत वाढ झाल्याने, पैशांची बचत होईल. घरामध्ये महागड्या वस्तूंची खरेदी कराल. तर बुधादित्य राजयोगामुळे नोकरीत मोठी जबाबदारी पदरात पडेल. पगारवाढ होण्यास मदत होईल. उद्योग-व्यापारात चांगली प्रगती होईल. कमी काळात व्यवसाय चांगला विस्तारेल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. घरात आनंदी वातावरण राहील.

मीन

सूर्य-बुधाच्या युतीने मीन राशीच्या लोकांच्या सर्व अडचणी दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. अविवाहित लोकांचे लग्न जुळून येईल. शिवाय रिलेशसनशिपमध्ये असणाऱ्यांचे नातेसंबंध आणखी मजबूत होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्यात पतीपत्नीमधील मतभेद दूर होतील. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. त्यातून मानसिक समाधान लाभेल. कोर्टामध्ये असलेल्या प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. याकाळात आयुष्यात कधीही न भेटलेले सुख अनुभवता येईल.

WhatsApp channel