ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. प्रत्येक ग्रह राशी परिवर्तनासाठी वेगळा कालावधी घेत असतो. त्याप्रमाणे सूर्य राशी बदल करण्यासाठी जवळपास १ महिन्याचा वेळ घेतो. नुकतेच सूर्याने वृषभ राशीतून मिथुन राशीत राशी परिवर्तन केले आहे. येत्या १६ जुलै पर्यंत सूर्य मिथुन राशीतच विराजमान असणार आहे. सूर्याच्या या गोचरने अनेक शुभ योग घटित होत आहेत. या शुभ योगांचा शुभ परिणाम राशीचक्रातील काही राशींवर पडत आहे. या सकारात्मक प्रभावाने काही राशींचे भाग्य पालटणार आहे. सूर्याच्या गोचरने 'मालिका' हा अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. या योगाने तीन राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे.
नुकतेच सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तत्पूर्वी मिथुन राशीत आधीपासूनच बुध आणि शुक्रदेखील विराजमान आहेत. तसेच वृषभ राशीमध्ये गुरु, कन्या राशीत केतू, कुंभ राशीत शनि, मेष राशीत मंगळ आणि मीन राशीत राहू विराजमान आहेत. हे सर्व शक्तिशाली ग्रह एकाच रेषेत येत असल्याने एक मालिका तयार होत आहे. अनेक ग्रह एकाच रेषेत येत असल्याने जो योग जुळून येतो त्याला 'मालिका राजयोग' असे म्हटले जाते. हा राजयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ असतो. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
सूर्याच्या संक्रमणाने निर्माण होणार मालिका राजयोग वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ मिळणार आहेत. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना विशेष फायदा मिळणार आहे. शिवाय एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर याकाळात करु शकता. त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती याकाळात पूर्ण होईल. तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा निर्माण होईल. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढून आकर्षण निर्माण होईल. नोकरदार वर्गाला हा राजयोग अत्यंत फायदेशीर असणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. यातून तुम्हाला पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. अध्यात्मिक-धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. मन उत्साही आणि प्रसन्न राहील.
मालिका राजयोगाचा मोठा फायदा सिंह राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेला प्रोजेक्ट अचानक गती घेईल. कुटुंबामध्ये सुरु असलेले मतभेद याकाळात दूर होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधल्याने नाते मजबूत होऊन प्रेम वाढीस लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचा नावलौकिक वाढेल. ऑफिसमध्ये प्रशंसेसोबतच मोठी जबाबदारी पदरात पडेल. लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत मूड अगदी रोमँटिक असणार आहे.
सूर्य गोचरने निर्माण होणाऱ्या मालिका राजयोगाचा लाभ तूळ राशीलासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुमची रखडलेली कामे नव्याने सुरु होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नातेसंबंध सुधारुन एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. पुरेसा पैसा हातात आल्याने आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
संबंधित बातम्या