वैदिक शास्त्रानुसार राशीचक्रातील बाराही राशी ग्रहांनी प्रभावित असतात. अर्थातच ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव या राशींवर पडत असतो. ग्रह एका विशिष्ट कालावधीत आपले स्थान बदलत असतात. या काळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांच्या या स्थान बदलांना संक्रमण म्हणजेच गोचर असे म्हटले जाते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाने विविध शुभ-अशुभ योग घटित होत असतात. या योगांचा चांगला किंवा वाईट परिणाम राशींवर दिसून येतो. या योगांचा काही राशींना फायदाच फायदा होतो तर काही राशींना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ग्रहांच्या राशी परिवर्तनाचे शास्त्रात विशेष महत्व आहे.
ज्ञान, बुद्धीचा प्रतीक असणारा बुध ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. बुध २९ जून २०२४ कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सूर्यदेवसुद्धा १६ जुलै २०२४ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. बुध आणि सूर्य कर्क राशीत एकत्र विराजमान झाल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. बुधादित्य राजयोग हा अतिशय शुभ समजला जातो. राशीचक्रातील काही राशींना या राजयोगाचा फायदा मिळणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
कर्क राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगाचा विशेष लाभ मिळणार आहे. कारण हा राजयोग कर्क राशीच्या लग्न भावात निर्माण होत आहे. याकाळात नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. समाजात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने आत्मविश्वास वाढेल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य आणखी बहरेल. पतिपत्नीमधील प्रेम दुपट्टीने वाढेल. शिवाय अविवाहित लोकांचे विवाह जुळून येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असणाऱ्यांना हा काळ उत्तम आहे.
कन्या राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगाचा फायदा मिळणार आहे. कारण हे राजयोग कन्या राशीच्या इन्कम आणि लाभ भावात निर्माण होत आहे. याकाळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. कमाईचे नवनवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. हातात पैसा आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अतिशय अनुकूल असणार आहे. अभ्यासात प्रगती सोबतच एखाद्या स्पर्धेत यशसुद्धा मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. बुधादित्य राजयोगात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक लाभ होईल. शिवाय भूतकाळात केलेली गुंतवणूकसुद्धा आता फायदेशीर ठरेल.
मिथुन राशीच्या लोकांनासुद्धा बुधादित्य राजयोगाचा चांगला लाभ मिळणार आहे. कारण या राशीत वाणी आणि धन भावात हा योग जुळून येत आहे. याकाळात तुम्हाला अनेकवेळा धनलाभ होतील. अनपेक्षित मार्गाने धन लाभ झाल्याने मन प्रसन्न होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. मनात ठरविलेल्या सर्व योजना पूर्ण होतील. रखडलेली कामे पार पडतील. याकाळात तुमच्या बोलण्यात, वागण्यात मोठा सकारात्मक बदल दिसेल. तुमच्या मधुर वाणीने लोक प्रभावित होतील. तुमचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार बनेल. कार्यक्षेत्रात बढती किंवा पगारवाढ होईल.
संबंधित बातम्या