मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Budh Gochar : बुध आणि सूर्य लवकरच बदलणार आपली चाल! 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ, येणार सुवर्णकाळ

Surya Budh Gochar : बुध आणि सूर्य लवकरच बदलणार आपली चाल! 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ, येणार सुवर्णकाळ

Jul 10, 2024 08:44 AM IST

Surya Budh Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार येत्या ऑगस्ट महिन्यात दोन मित्र ग्रह म्हणजेच सूर्य आणि बुध आपली चाल बदलणार आहेत.

सूर्य बुध संक्रमणाचा राशींवर प्रभाव
सूर्य बुध संक्रमणाचा राशींवर प्रभाव

वैदिक शास्त्रानुसार मित्र आणि शत्रू ग्रह एका ठराविक अंतराने आपले स्थान बदलत असतात. हे स्थान बदल ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. या स्थान बदलालाच ज्योतिषीय भाषेत ग्रहांचे गोचर असे म्हटले जाते. गोचरमधये ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात. परंतु या नऊ ग्रहांचा प्रत्येकाचा एक निश्चित कालावधी असतो. त्या निश्चित कालावधीतच ग्रह गोचर करतात. शिवाय यातून ते अनेक शुभ संयोग निर्माण करतात. ज्याचा फायदा आणि नुकसान १२ राशींना होत असतो. सध्या जुलै महिन्यात अनेक योग जुळून आले आहेत. दरम्यान येत्या ऑगस्ट महिन्यातसुद्धा ग्रहांच्या गोचरमधून अनेक योग जुळून येणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार येत्या ऑगस्ट महिन्यात दोन मित्र ग्रह म्हणजेच सूर्य आणि बुध आपली चाल बदलणार आहेत. याप्रमाणे ग्रहांचा राजा असणारे सूर्यदेव आपली स्वराशी सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे बुद्धी आणि व्यापार दाता बुध कर्क राशीत वक्री होणार आहेत. या दोन मित्र ग्रहांच्या चाल बदलाने शुभ संयोग निर्माण होणार आहे. जो राशीचक्रातील काही राशींसाठी अतिशय खास असणार आहे. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

सिंह

सूर्याचे सिंह राशीत गोचर आणि बुध वक्री या दोन्ही गोष्टी सिंह राशीच्या लोकांसाठी प्रचंड फायदेशीर ठरणार आहेत. याकाळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. पैसे कमविण्याचे नवे मार्ग सापडतील. त्यातून आर्थिक स्थैर्य येईल. भविष्याच्यादृष्टीने काही बचत करणे शक्य होईल. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. पदोन्नती किंवा पगारवाढीचा योग आहे. व्यापारात विस्तार होईल. वैवाहिक आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव मिळू शकतो.

कर्क

कर्क राशीलासुद्धा या दोन्ही ग्रहांच्या चाल बदलीचा लाभ होणार आहे. याकाळात अनेकवेळा आकस्मिक धनलाभासारख्या घटना घडतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे मन उत्साही आणि आनंदी राहील. घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न कराल. त्यात यश लाभेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. करिअर-नोकरीमध्ये विविध संधी प्राप्त होतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. मनावरील तणाव दूर होऊन मानसिक समाधान लाभेल. व्यवसाय-व्यापारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांवर सूर्य आणि बुध यांच्या चाल बदलीचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. व्यवसायात वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी पदरी पडेल. कामात सकारात्मकता निर्माण होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळण्याचा योग आहे.

WhatsApp channel