Solar and Lunar Eclipse 2025 In Marathi : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो, असे मानले जाते. नवीन वर्ष २०२५ मध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणांसह एकूण ४ ग्रहणे होतील. या चार ग्रहणांपैकी एक ग्रहण भारतात दिसणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळात चंद्र सूर्याला काही काळ झाकून ठेवतो. नवीन वर्ष २०२५ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. त्याचवेळी जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही. त्यामुळे या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चला जाणून घेऊया २०२५ मध्ये कधी होणार ग्रहण?
नासाच्या अहवालानुसार, वर्ष २०२५ चे पहिले चंद्रग्रहण १४ मार्च २०२५ रोजी होणार आहे. पहिलं चंद्रग्रहण सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ०२ वाजून १८ मिनिटांनी संपेल. हे खग्रास चंद्रग्रहण असेल. याला ब्लड मून असेही म्हणतात. कारण त्याचा रंग एकदम चमकदार आणि गडद लाल असतो. सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने व्यापलेला असेल. पहिले चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिकेत दिसणार आहे. भारतात पहिलं चंद्रग्रहण दिसणार नाही.
नासाच्या अहवालानुसार, २०२५ सालचे पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण आशिया, वायव्य आफ्रिका, उत्तर अमेरिकेचे अनेक भाग आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसेल. २०२५ सालचं पहिलं सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत संरेखित होत नाहीत तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते. अशा वेळी चंद्र सूर्याचा फक्त एक भाग व्यापू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ सालचं दुसरं चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. दुसरे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ०१ वाजून २६ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण देखील खग्रास चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका आणि भारतातील अनेक भागांमध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहणे तीन प्रकारची असतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण.
नासाच्या अहवालानुसार, २०२५ सालचे दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी होईल आणि रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी यूटीसी (युनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेटेड) संपेल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. दक्षिण ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटलांटिक आणि अंटार्क्टिका मध्ये दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. दुसरे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणांचे तीन प्रकार आहेत. खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण.
संबंधित बातम्या