Surya Rashi Parivartan in Gemini 2024 : ग्रहांचा राजा सूर्याने 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. मिथुन राशीमध्ये बुध ग्रह आधीपासून स्थित आहे, त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने बुधादित्य योग तयार झाला आहे. १६ जुलै २०२४ पर्यंत सूर्य सध्याच्या स्थितीत राहील आणि त्यानंतर तो मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांवर सकारात्मक तर काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल. चला आता जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांचा त्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
सूर्य हा दुसऱ्या स्थानाचा स्वामी आहे आणि कर्क राशीच्या बाराव्या स्थानी आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांचा ताण-तणाव वाढू शकतो आणि त्यांना एखाद्या गोष्टिची फार काळजी वाटू शकते. नोकरी करणाऱ्या नोकरदार लोकांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते आणि त्यांच्यासमोर फारशा संधी नसतील. यासोबतच या काळात अडचणी किंवा कामाचा ताण वाढण्याचीही फार शक्यता आहे. तुम्हाला सांभाळून राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
सूर्य दहाव्या स्थानाचा स्वामी आहे आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठव्या भावात स्थित आहे. या काळात नोकरी गमावण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवू शकणार नाही. अनेक कारणांमुळे नोकरी गमावण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा, कामकाजाकडे दुर्लक्ष करू नका.
सूर्य आठव्या घराचा स्वामी आहे आणि मकर राशीच्या लोकांसाठी सहाव्या भावात स्थित आहे. नोकरी करणाऱ्या नोकरदार लोकांसाठी नोकरी बदलाची शक्यता आहे. तुमच्या जीवनात होत असलेल्या अनेक बदलांमुळे तुम्ही आनंदी राहणार नाहीत. हा काळ तुमच्यासाठी सांभाळून राहण्याचा आहे.
सूर्य हा सहाव्या स्थानाचा स्वामी असून, मीन राशीच्या लोकांसाठी चौथ्या भावात स्थित आहे. या काळात खर्च वाढू शकतो. या काळात तुमचा खर्च भागवण्यासाठी कर्ज घेण्याची गरज भासू शकते. तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध नोकरी करावी लागू शकते. कर्क राशीचे लोकं नोकरीच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीमुळे त्रस्त होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाचा दबाव वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही फार काळजीत पडू शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या