Surya Rashi Parivartan : सर्व ग्रहांचा राजा अशी ओळख असलेल्या सूर्यदेवाला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. सूर्यदेवाला आत्म्याचा कारक ग्रह म्हणतात. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. संपूर्ण राशीचक्र फिरण्यासाठी सूर्याला १२ महिने लागतात. या महिन्यात १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळं अनेक बदल घडणार आहेत.
सिंह ही सूर्याची स्व-राशी आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. सिंह राशीत सूर्याचा प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा तो काही राशींचं झोपलेलं भाग्य देखील बदलतो, असं म्हणतात.
जमीन आणि मालमत्तेच्या कामातून धनलाभ होईल. सूर्याच्या गोचरामुळं मान-सन्मान वाढेल. अधिकारी तुमच्यावर खूश होतील. यावेळी नवीन योजना आखल्या जातील. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. लव्ह लाईफ खूप चांगली राहील.
मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेले पैसे परत केले जातील. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. आजाराचं निदान होईल, पण त्यातून लवकर सुटकाही होईल. नव्या योजना आखाल, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. सिंह राशीत सूर्याचे संक्रमण तुम्हाला खूप श्रीमंत बनवेल.
सूर्यदेव या राशीत गोचर करणार आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी १६ ऑगस्टनंतरचा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कोणत्याही प्रकारच्या चिंतेतून सुटका मिळू शकते. आपल्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतात. सहलीला जाण्याचा योग येईल. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करू शकाल. खरेदी-विक्रीत फायदा होऊ शकतो.
सिंह राशीत सूर्याच्या प्रवेशामुळं शुभ परिणाम मिळतील. आपल्या निर्णयांचा मोठा फायदा होईल. जुनी रखडलेली कामं पूर्ण होतील. धनलाभ होऊ शकतो. लोकांचं कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. त्यात अधिकाऱ्यांचा समावेश असेल. आनंदाचं वातावरण राहील. मान-सन्मानात वाढ होईल. अधिकारी खूश होतील.