Surya Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीतच एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. या गोचर मुळे विविध योग घटित होतात. या योगांचा थेट प्रभाव राशीचक्रातील राशींवर पडत असतो. शिवाय वैदिक शास्त्रानुसार राशीचक्रातील प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. या ग्रहाचा शुभ प्रभाव त्या राशींवर पडत असतो. शिवाय ग्रहांच्या गुणधर्माचा प्रभावसुद्धा राशींवर दिसून येतो. त्यामुळेच प्रत्येक राशीचे लोक ग्रहाच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. तसेच हे स्वामी ग्रह त्यांच्या स्वराशीत विराजमान झाल्यास त्या राशींना तर लाभ मिळतोच, शिवाय आजूबाजूच्या काही राशींनादेखील त्याचा लाभ झालेला दिसून येतो.
येत्या ऑगस्ट महिन्यात सूर्य आपली राशी बदलणार आहे. सूर्य आपली स्वराशी असणाऱ्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याच काळात व्यापार दाता बुधसुद्धा आपली राशी बदलणार आहे. वास्तविक बुध कर्क राशीतून वक्री होणार आहे. सूर्य आणि बुधच्या हालचालींचा शुभ परिणाम काही राशींवर दिसून येणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे १६ ऑगस्ट रोजी सांयकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी बुध कर्क राशीत वक्री होईल.
सिंह राशीच्या लोकांना मंगळ आणि बुधच्या राशी परिवर्तनाचा लाभ मिळणार आहे. सूर्य सिंह राशीतच गोचर करत असल्याने या राशीला दुहेरी लाभ मिळेल. याकाळात तुमच्यासोबत सतत धनलाभाचे प्रसंग घडतील. आर्थिक स्थर उंचावेल. घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरीत चांगली प्रगती होईल. तुमच्या कामाचे आणि बुद्धिकौशल्याचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक नफा जाणवेल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. बेरोजगारांना याकाळात रोजगार मिळेल. घरातील वातावरण उत्तम असेल.
सूर्य-बुधच्या गोचरचा शुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवरसुद्धा पडणार आहे. याकाळात तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. धन मिळविण्याचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आर्थिक अडचणी संपुष्ठात येतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन उत्तम स्वास्थ्य लाभेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावित होतील. नोकरीत प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. घरामध्ये महागडी खरेदी होईल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. व्यापारात आर्थिक फायदा होईल.
सिंह आणि कर्क राशीच्या लोकांप्रमाणेच वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा या रशिपरिवर्तनाचा फायदा होणार आहे. याकाळात तुमचे करिअर नव्या वळणावर पोहोचेल. ज्यातून तुम्हाला लाभच होईल. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी पदरात पडेल. सहकारी तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. याकाळात चांगला धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील. मतभेद दूर होऊन कौटुंबिक संबंध सुधारतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. भविष्याच्या दृष्टीने संवाद साधला जाईल.
संबंधित बातम्या