ज्योतिषशास्त्र हे जसं व्यक्तीच्या भविष्यात किंवा वर्तमान किंवा भूतकाळात काय घडलं आहे किंवा काय घडणार आहे याची माहिती देतं अगदी त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रही आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाची, त्याच्या करिअरची माहिती देते. तळ हातावरच्या रेषा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात. मात्र तुमच्या हातावर सूर्य रेषा आहे का हे एकदा ज्योतिषाला विचारा. कारण ज्यांच्या हातावर ही सूर्य रेषा असते त्या व्यक्ती अत्यंत भाग्यवान असतात. तळहातावरचा सूर्य बलवान असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते.
प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर सूर्य रेषा चंद्र पर्वतातून बाहेर पडून सूर्य पर्वताकडे जाताना दिसते. जेव्हा सूर्य रेषा तळहातावर प्रबळ असते तेव्हा त्या व्यक्ती हुशार मानल्या जातात आणि त्या व्यक्ती आपल्या बोलण्याने इतर लोकांवर प्रभाव टाकतात. अशा लोकांना डॉक्टर, अभियांत्रिकी आणि शिक्षण या व्यवसायात यश मिळते. जर सूर्य रेषा खोल आणि सुस्पष्ट असेल तर अशा व्यक्तीला सर्व कार्यात यश मिळते. तसेच, हे लोक खूप प्रबळ इच्छाशक्तीचे मानले जातात.
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जीवनरेषेतून बाहेर पडणारी सूर्यरेषा, हातावरच्या सूर्य क्षेत्रापर्यंत पोहोचत असेल, तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. अशा लोकांना समाजात उच्च दर्जा मिळतो आणि प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळते.
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातातील भाग्य रेषेतून निघणारी सूर्य रेषा जाड आणि काळी असेल तर अशा लोकांचे आयुष्य खूप सोपे असते. अशा व्यक्तींना पैशाची कधीच कमतरता नसते. या व्यक्ती ज्या व्यवसायात असतात तिथे भरपूर नफा कमावतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर पातळ आणि अस्पष्ट सूर्य रेषा असेल तर ती अत्यंत अशुभ मानली जाते. जेव्हा सूर्य रेषा पातळ असते तेव्हा कठोर परिश्रम करूनही केवळ अंशतः यश हातात असते. आर्थिक लाभासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या