पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १८ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळले. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. 

वृषभ - कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. 

मिथुन - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कामाचा ताण वाढू शकतो. 

कर्क - आत्मविश्वास राहिल. मात्र आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

सिंह - मानसिक ताण येऊ शकतो. वैवाहिक जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. बोलताना संयम ठेवा. उत्पन्नाचे स्रोत बनू शकतात. 

कन्या - आत्मविश्वास कायम राहिल. मात्र तुमच्या भावनांना नियंत्रणात ठेवा. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतो. 

तूळ - मन अशांत राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून पैशाचा फायदा होऊ शकतो. 

वृश्चिक - आत्मविश्वास राहिल. मात्र राग जास्त येईल. नोकरीचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. 

धनू - मन अशांत राहिल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे साधन विकसित होऊ शकते.

मकर - मनावर नकारात्मक विचाराचा प्रभाव असेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे चिंतेत रहाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. रागाचा अतिरेक टाळा. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

मीन - रागाचे प्रमाण जास्त राहिल. मात्र बोलण्यात सौम्यता असेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. गोड खाण्याकडे कल असेल.

पं. राघवेंद्र शर्मा