पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ९ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाची स्थिती समाधानकारक असेल. 

वृषभ - मित्रांकडून सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती असेल. उत्पन्न वाढेल. मात्र खर्च देखील वाढेल. 

मिथुन - आत्मविश्वास राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. तरी सुध्दा प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. 

कर्क - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास असेल. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात यश मिळेल. खाण्यात रस राहिल. 

सिंह - संचित धन कमी होईल. खर्च वाढेल. मित्रांच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. 

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. राजकीय नेत्याची भेट होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या महिलेकडून पैसे मिळू शकतात. 

तूळ - मानसिक शांती राहिल. मात्र भांडण टाळण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती राहिल. 

वृश्चिक - रागाचा अतिरेक टाळा. वाहन देखभालीसाठी खर्च वाढेल. पैशांची स्थिती सुधारेल. 

धनू - आळशीपणा वाढेल. नोकरीत परिवर्तन होऊ शकते. मान-सन्मानात वाढ होईल. 

मकर - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. व्यवसायाची स्थिती समाधानकारक असेल. प्रवास लाभदायी होईल. खर्च वाढेल.

कुंभ - कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. आईचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन - धैर्यशीलता कमी होईल. कुटुंबातील समस्यांमुळे त्रास होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा