पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ६ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

वृषभ - आत्मविश्वास राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. उत्पन्न कमी आणि खर्च वाढेल. 

मिथुन - मन अशांत राहिल. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. 

कर्क - कला आणि संगीताकडे कल वाढेल. अनियोजित खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह - आशा- निराशा असे भाव मनात राहतील. बोलताना संयम ठेवा. शैक्षणिक कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कन्या - आत्मसंयम ठेवा. कुटुंबात पसस्पर मतभेद होऊ शकतात. संचित धन कमी होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

तूळ - धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. अधिक कष्ट करावे लागतील. धर्म कार्यात व्यग्र रहाल. 

वृश्चिक - वैवाहिक सुखात वाढ होईल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणात बदल होऊ शकतो. 

धनू - शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात रस वाढेल. आईचे सहकार्य मिळेल. कपडे खरेदीवर खर्च वाढेल. 

मकर - बोलण्यात सौम्यता राहिल. कुटुंबासोबत प्रवास करु शकता. कुटुंब सुखात वाढ होईल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. एखाद्या मित्राची भेट होईल. वाहन सुखात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. 

मीन - रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. मुलांना त्रास होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा