पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ४ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आईचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृषभ - वास्तू सुखात वाढ होईल. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. तब्येतीची काळजी घ्या.

मिथुन - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाची संधी. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क - शैक्षणिक कामात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. अनियोजित खर्च वाढेल.

सिंह - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. भावा-बहिणींशी वैचारिक मतभेद होतील.

कन्या - मनात अशांतता राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल. अधिक कष्ट करावे लागतील.

तूळ - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. कला आणि संगीत याबद्दलची आवड वाढेल. मनात नकारात्मक विचार येतील.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. संततीकडून आनंदाची बातमी हाती येईल. कुटुंबासोबत यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

धनू - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वास्तूच्या देखभालीवर आणि सजावटीवर खर्च होईल.

मकर - एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. अनियोजित खर्चात वाढ होईल. कुटुंबात वाद विवाद होऊ शकतात. 

कुंभ - आत्मसंयम बाळगा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरी मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होईल.

मीन - तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबासोबत यात्रेवर जाण्याचे योग आहेत. संततीला अधिक कष्ट करावे लागतील.

पं. राघवेंद्र शर्मा