पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २८ ऑगस्ट २०१९

राशी भविष्य

मेष - भौतिक सुखात वाढ होईल. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. व्यवसायात सुधारणा होईल. 

वृषभ - नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. मात्र दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. 

मिथुन - मन अशांत राहिल. बोलण्यात सौम्यता असेल. पैशांची स्थिती सुधारेल. कामामध्ये जास्त परिश्रम करावे लागतील. 

कर्क - मन शांत आणि आनंदी राहील. नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळू शकते. शैक्षणिक कामात यश मिळेल. 

सिंह - मानसिक तणावात असाल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. प्रवास सुखद होईल. 

कन्या - मन अशांत राहिल. पालकांना आरोग्यासंबंधी विकार होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

तूळ - राग वाढेल. धार्मिक कार्यात अडथळा येऊ शकतो. उत्पन्नाच्या वाढीसाठी स्रोत विकसित होऊ शकतात. 

वृश्चिक -  वैवाहिक सुखात वाढ होईल. नोकरीमध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढले. 

धनू - घरामध्ये धार्मिक कार्य होऊ शकतात. घराची देखभाल आणि सजावटीसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ होऊ शकते. 

मकर - मन शांत राहील. परंतू मनावर नकारात्मक विचारांचा परिणाम होऊ शकतो. धार्मिक कार्यात वाढ होईल. 

कुंभ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाहन सुखामध्ये वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मीन - आत्मविश्वास राहिल. मानसिक शांती मिळेल. मित्रांसोबत परदेशात जाण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत जागरुक रहा. 


पं. राघवेंद्र शर्मा