पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २६ फेब्रुवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास कमी असेल. चिडचिडेपणा जाणवेल. संततीकडून सुखद समाचार मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. वाणीवर नियंत्रण ठेवा. मन अशांत राहिल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. अधिक कष्ट करावे लागतील. 

मिथुन - कुटुंबाच्या अडचणी कमी होतील. थकीत धन प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कर्क - आत्मविश्वासत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामात उत्साह जाणवेल.

सिंह - आत्मसंयत राहा. धार्मिक कार्यात रस राहिल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वाहन सुखात वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कन्या - मानसिक शांतता राहिल. परंतु, आत्मविश्वास कमी असेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कुटुंबात सुख-शांती राहिल. खर्च वाढेल.

तूळ - धैर्यशीलता कमी राहिल. व्यावसायिक कार्यात रस निर्माण होईल. वडिलांना आरोग्याची तक्रार जाणवेल. खर्च वाढेल. मित्राचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आईकडून धन प्राप्तीचे योग. नोकरीत पदोन्नतीची संधी. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

धनू - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. स्वभावात जिद्दीपणा राहिल. संततीकडून गोड बातमी समजेल. पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील.

मकर - नोकरीत इच्छेविरुद्ध बदलीची शक्यता. जुन्या मित्रांची भेट होईल. व्यवसाय विस्तारेल. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ - वाणीत सौम्यता राहिल. पण राग टाळा. राहणीमान कष्टप्रद राहिल. प्रवासाला जाल. अनियोजित खर्चांत वाढ होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल.

मीन - धर्माप्रती श्रद्धाभावर राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. कौटुंबिक समस्या वाढतील. 

पं. राघवेंद्र शर्मा