पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २५ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  मन अशांत राहिल, आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. बोलताना संयम ठेवा.  आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात धार्मिक कार्य संभवेल.

वृषभ - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मित्रांचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल. आईच्या तब्येतीला जपा. 

मिथुन - कला आणि संगीतात रुची वाढेल.  मित्रांचं सहकार्य लाभेल. आशा-निराशा मिश्रित दिवस असेल. राहणीमान कष्टदायक असेल. 

कर्क - मन अशांत राहिल.  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. जोडीदारासोबत वैचरिक मतभेद संभवतील.  अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर  पडेल.

सिंह - मनात निराशेचा किंवा असंतोषाचा भाव राहिल. रागाचा अतिरेक टाळा. कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. खाण्यापिण्यात रुची वाढेल.

कन्या - रागाचा अतिरेक टाळा. भक्तीगीतात रुची वाढेल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. घरात धार्मिक कार्य संभवतील.

तूळ - कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. कला आणि संगितात रुची वाढेल. मन अशांत राहिल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक - बोलताना संयम  बाळगा. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. स्वभाव हट्टी राहिल. भावंडांचं  सहकार्य लाभेल. 

धनू - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांती राहिल. संयम बाळगा. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येईल. 

मकर - संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल.  आरोग्याची समस्या जाणवेल. खर्चात वाढ होईल. 

कुंभ - मन अशांत राहिल. आई- वडिलांचे सहकार्य लाभेल. नोकरीत परीवर्तनाची शक्यता. कुटुंबाची काळजी घ्या.

मीन - भावनांवर नियंत्रण ठेवा. मन अशांत राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. जोडीदारासोबत मतभेद होतील.

पं. राघवेंद्र शर्मा