पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २२ जानेवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - सुखात वाढ होईल. आईच्या सानिध्यात दिवस जाईल. मन शांत राहिल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. 

वृषभ - स्वत:वर संयम ठेवा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कौटुंबिक समस्यांनी मन ग्रासेल. नोकरीत प्रगतीची संधी उपलब्ध होईल. पर्यटनाला जाण्याचा योग येईल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल. 

मिथुन - मनात अशांत राहिल. अनेक कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागेल. स्वभाव चिडचिडा राहिल. कुटुंबाचं  सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.  वाहन सुख लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - मन शांत आणि प्रसन्न  राहिल. मानसिक शांती लाभेल.  जोडीदारासोबत मतभेद होण्याची दाट शक्यता. नोकरीत प्रगतीची संधी. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. 

सिंह -  आईचे सानिध्य लाभेल. कौटुंबिक जीवन सुखकारत असेल. स्वभाव चिडचिडा होईल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल.

कन्या - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग प्राप्त होईल. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ - आत्मविश्वास भरपूर वाढेल.  वडिलांच्या व्यावसायात वृद्धी होईल. राहणीमान कष्टदायी असेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल. जोडीदाराकडून धनलाभाची शक्यता.

वृश्चिक -  जोडीदारासोबत वैचारिक मतभेद संभवतील. उत्पन्नात वाढ होईल. घराच्या नुतनीकरणाचे काम निघेल. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील.

धनू - मानसिक शांती राहिल. मात्र आळशी व्हाल. खर्चात वाढ होण्याची शक्यता. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर येईल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. नोकरीत परीवर्तनाची शक्यता अधिक.

मकर - कौटुंबिक जीवन अधिक सुखकारक असेल. मानसिक शांती जाणवेल. वाहन खर्चात वाढ होईल.  मित्राचं सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.  उत्पन्नात वाढ होईल मात्र खर्चही वाढेल. 

कुंभ -  घरातील लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. भावनांना आवर घाला. काही कौटुंबिक समस्या  जाणवतील. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

मीन - मन अशांत राहिल. मनात निराशेची भावना जाणवेल. मित्राच्या सहकार्यानं उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. शैक्षणिक क्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. कुटुंबात धार्मिक कार्याची शक्यता.

पं. राघवेंद्र शर्मा