पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १९ फेब्रुवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग टाळा. मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न कमी राहिल.

वृषभ - नोकरीत पदोन्नतीची संधी. कामाच्या ठिकाणी बदलीची शक्यता. आत्मविश्वास जाणवेल.

मिथुन - आत्मसंयत राहा. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेदाची शक्यता. बदलीचेही योग. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. आत्मविश्वास कमी राहिल. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह - आत्मविश्वास जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होईल. घरात धार्मिक कार्य होईल. अधिक कष्ट करावे लागतील.

कन्या - आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील. कौटुंबिक समस्या वाढतील. घरात धार्मक कार्य होईल.

तूळ - कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अधिक कष्ट करावे लागतील. आत्मसंयत राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वाहन सुखात वाढ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल.

धनू - कुटुंबात कलहाची स्थिती राहिल. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी राहिल. नोकरीत इच्छेविरुद्ध जबाबदारी मिळू शकते.

मकर - आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. खर्चांत वाढ होईल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. व्यवसायात अ़़डचणी येतील.

कुंभ - आत्मविश्वास कमी राहिल. भावनांवर नियंत्रण ठेवा. राग टाळा. मित्राची भेट होईल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल.

मीन - वैवाहिक जोडीदारास आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. आत्मसंयत राहा. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. मानसिक तणाव जाणवेल.

पं. राघवेंद्र शर्मा