पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १५ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आशा- निराशा मिश्रीत भाव असेल. मन अशांत राहिल. मित्राच्या मदतीनं  नोकरीची संधी मिळेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. नोकरीत प्रगतीची संधी प्राप्त होईल. 

वृषभ - कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. आत्मविश्वास द्विगुणीत होईल. भावंडांचं सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी प्राप्त होईल. 

मिथुन - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वत:वर संयम ठेवा.  आरोग्याची काळजी घ्या. रागाचा अतिरेक करु नका. शैक्षणिक क्षेत्रात रुची वाढेल. 

कर्क - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची  कमी जाणवेल. आशा- निराशा मिश्रीत भाव राहिल. रागाचा अतिरेक करु नका. मुलांना आरोग्याची समस्या ग्रासू शकते. 

सिंह - मानसिक शांती लाभेल. मात्र आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  खर्चात वाढ होईल, मात्र उत्पन्न घटेल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतील. 

कन्या -  आत्मविश्वास भरपूर वाढेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. भवन सुख किंवा संपत्ती सुखाचा लाभ होईल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. मुलांना आरोग्याची समस्या ग्रासू शकते. 

तूळ - आत्मविश्वास भरपूर वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याचे योग येतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. बोलताना संयम आवश्य बाळगा.

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी अनेक कठिण प्रसंगांना समोरं जावं लागेल. आईकडून आर्थिक सहाय्य मिळू शकते. भावंडांसोबत विवाद होऊ शकतो. अनियोजित खर्चात वाढ होईल.  वडिलांची प्रकृती बिघडेल. 

धनू - मानसिक शांती राहिल, मात्र बोलण्यात कठोरता जाणवेल. व्यर्थ वाद विवादांपासून स्वत:ला दूर ठेवा. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मान- सन्मान मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. 

मकर - मन अशांत राहिल आत्मविश्वासाची कमी जाणवेल. जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल. स्वभाव चिडचिडा राहिल. खर्चात वाढ होईल.  स्वत:वर संयम ठेवा. 

कुंभ - आशा- निराशा मिश्रित भाव राहतील. धार्मिक कार्यात रुची प्राप्त होईल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. 

मीन - मुलांची प्रकृती बिघडेल. मन अशांत राहिल. नोकरीत कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. वाहन सुखाचा योग आहे. कुटुंबात धार्मिक कार्य संभवेल.