पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १३ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - वाणीत सौम्यता राहिल. आत्मविश्वास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

वृषभ - धैर्यशीलता वाढेल. कौटुंबीक समस्या त्रस्त करु शकतात. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे.

मिथुन - धर्म-कर्मांत रुची वाढेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.

कर्क - आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होऊ शकतात.

सिंह - मन अशांत राहिल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात.

कन्या - क्रोध अधिक येईल. संचित धन कमी होऊ शकते. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

तूळ - धैर्यशीलता कमी होईल. लेखनादी-बौद्धिक कार्यांत व्यस्तता राहिल. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे योग.

वृश्चिक - कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीत पदोन्नतीची संधी.

धनू - पठन-पाठनात आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम जाणवतील. व्यवसायाचा विस्तार होईल. लाभाचे योग आहेत.

मकर - आत्मविश्वास कमी असेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. वडिलांकडून धन प्राप्तीचे योग. खर्च अधिक असेल.

कुंभ - आत्मविश्वास जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील.

मीन - मानसिक शांतता राहिल. पण वाणीवर कठोरतेचा प्रभाव जाणवू शकतो. कुटुंबाबरोबर प्रवासाला जाण्याचे योग आहेत.

पं. राघवेंद्र शर्मा