पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ११ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - स्वभावात चिडचिडेपणा राहू शकतो. संततीकडून आनंदाची वार्ता समजेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृषभ - शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. नोकरीत बदलीची शक्यता. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहिल. 

मिथुन - कौटुंबिक सुख कमी मिळेल. संचित धन कमी होण्याची शक्यता. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. अधिक परिश्रम राहिल.

कर्क - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, घरगुती समस्यांपासून सावध राहा. अनियोजित खर्च वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह - क्रोध आणि आवेशापासून दूर राहा. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. आईचे सानिध्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या - आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु नाहक वादापासून वाचण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल होऊ शकतो.

तूळ - वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलणे संतुलित ठेवा. व्यवसायात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक - पठन-पाठनात रुची राहिल. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील.

धनू - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. वाहन सुखात वाढ होऊ सकते.

मकर - धार्मिक संगीताप्रती आवड निर्माण होईल. संततीकडून सुखद वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल

कुंभ - धैर्यशीलता कमी राहिल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. वाहन सुखात कमतरता जाणवेल. संततीला कष्ट करावे लागतील.

मीन - कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कुटुंबाबरोबर प्रवासाला जाण्याचे योग आहेत.

पं. राघवेंद्र शर्मा