पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ६ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास कमी होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

वृषभ - नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचे योग आहेत. व्यवसायात भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. फायदा कमाविण्याची संधी. अधिक कष्ट करावे लागतील.

मिथुन - शैक्षणिक कामात अडचणी येतील. कपड्यांवरील खर्च वाढेल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल. बोलताना संयम बाळगा.

कर्क - मनात अशांतता राहिल. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल. अनियोजित खर्च वाढेल.

सिंह - मिळकत कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल्याने तणाव येईल. व्यवसायात अडचणी येतील. 

कन्या - मानसिक शांतता राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. एखाद्या जुन्या मित्राचे आगमन होईल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो.

तूळ - आत्मसंयम बाळगा. धैर्यशीलपणा कमी होईल. कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

वृश्चिक - मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. व्यवसायात भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. लाभाची संधी मिळेल.

धनू - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वास्तूच्या देखभालीवर खर्च करावा लागेल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो.

मकर - आत्मविश्वास कमी होईल. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील. अनियोजित खर्चात वाढ होईल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल.

कुंभ - धैर्यशीलता कमी होईल. आत्मसंयम बाळगा. मित्रांशी वैचारिक मतभेद होतील. तब्येतीची काळजी घ्या.

मीन - मानसिक शांतता राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आईला एखादा आजार होण्याची शक्यता. 

पं. राघवेंद्र शर्मा