पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ३१ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मानसिक शांती लाभेल मात्र  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. लिखाणात आणि बौद्धिक कार्यात रुची प्राप्त होईल. 

वृषभ - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा  सामना करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. 

मिथुन -  बोलताना  संयम ठेवा. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  कौटुंबिक समस्यांमुळे मन चिंतेत असेल. खर्चात वाढ होईल. 

कर्क - आत्मविश्वासात वाढ होईल. मानसिक शांती लाभेल कुटुंबांचं सहकार्य प्राप्त होईल. मुलांच्या तब्येतीला जपा. 

सिंह - मनात असंतोष खदखदत राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस आहे. कौटुंबीक समस्यांमुळे मन चलबिचल होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. मनात निराशेचा भाव दाटेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. 

तूळ -  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. उत्पन्नात कमी जाणवेल तर खर्चातही वाढ होईल. गोड खावेसे वाटेल.

वृश्चिक - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. शैक्षणिक कार्यात अडचणींचा सामना करावा लागेल. गोड खावेसे वाटेल. राहणीमान कष्टदायक असेल. 

धनू -  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कौटुंबीक समस्यांमुळे मन बेचैन होईल. बोलताना संयम बाळगा. मित्रांचं सहकार्य लाभेल.

मकर -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल मात्र अतिउत्साहीपणा टाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील.

कुंभ - घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता.  मन शांत आणि प्रसन्न  राहिल. मनात श्रद्धेचा भाव असेल. 

मीन - स्वत:वर संयम ठेवा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही नवे मार्ग सापडतील.