पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ३ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. स्वभावात जिद्दीपणा येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

वृषभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. तब्येतीची काळजी घ्या. एखाद्या मित्राचे आगमन होईल. यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

मिथुन - मानसिक शांतता लाभेल. अधिक खर्च झाल्याने त्रस्त व्हाल. कार्यक्षेत्रात अधिक कष्ट करावे लागतील.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. धैर्यशीलपणा कमी होण्याची शक्यता. बोलताना काळजी घ्या. धर्म-कर्म याबद्दल आवड वाढेल.

सिंह - मन अशांत राहिल. मानसिक तणाव राहिल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. बढतीचे योग आहेत.

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. बोलताना काळजी घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील.

तूळ - मानसिक शांतता राहिल. तरीही बोलताना काळजी घ्या. एखाद्या मित्राशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. 

धनू - मानसिक शांतता राहिल. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. बढतीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

मकर - मनात नकारात्मक विचार येतील. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहिल. आईला एखादा आजार होण्याची शक्यता.

कुंभ - रागाचा अतिरेक होण्याची शक्यता. शैक्षणिक किंवा बौद्धिक कामात अडचणी येण्याची शक्यता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

मीन - धैर्यशीलपणा कमी होईल. संततीला त्रास होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सुख कमी होईल.

पं. राघवेंद्र शर्मा