पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ जानेवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मन अशांत राहिल. मनात असंतोष खदखदत राहिल. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. घरात धार्मिक कार्य  होईल.  मात्र  बोलताना संयम बाळगा.  

वृषभ - स्वभाव चिडचिडा राहिल. मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्यांनी मन ग्रासेल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. जुन्या मित्राचं आगमन होईल. मान- सन्मान मिळेल.

मिथुन -  आत्मविश्वास वाढेल. मात्र स्वत:वर नियंत्रण ठेवा.  मेहनत अधिक घ्यावी लागेल. नोकरीच्या क्षेत्रात परिवर्तनाची शक्यता आहे.  उत्पन्नात वाढ होईल.  वाहन सुख लाभेल मात्र वाहनाच्या देखरेखीवरही खर्च वाढेल. 

कर्क - जोडीदाराच्या आरोग्यास जपा. मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची  कमी जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्याचं सहकार्य लाभेल अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. जुन्या मित्रांचं आगमन होईल.

सिंह -  स्वत:वर नियंत्रण ठेवणं आवश्यक. भावनांना आवर घाला. मन अशांत  राहिल. रागाचा अतिरेक करु नका. जोडीदारास आरोग्याची समस्या जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी परिवर्तनाची शक्यता. 

कन्या - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांशी  काही मतभेद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मित्रांचं सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

तूळ - मन अशांत राहिल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद संभवतील.  कला आणि संगितात रुची वाढेल. 

वृश्चिक - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. मात्र अतिउत्साहीपणा टाळा. मित्रांच्या सहकार्यानं  नोकरीत परिवर्तनाची संधी.  

धनू - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल मात्र स्वत:वर नियंत्रण आवश्यक. अधिक आळशी व्हाल. भावंडासोबत मतभेदाची शक्यता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर - भावंडांसोबत नातं अधिक मजबूत होईल.  संपत्तीवर खर्च वाढेल. मानसिक शांती लाभेल मात्र स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचे योग.

कुंभ - मन अशांत राहिल. स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा.  नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. मित्रांसोबत पर्यटनाला जाण्याचा योग आहे.

मीन - मानसिक शांती लाभेल. मात्र खर्चात वाढ झाल्यानं मन चिंताग्रस्त राहिल. राग अनावर होईल. बोलताना संयम बाळगा. आरोग्याची काळजी घ्या.

पं. राघवेंद्र शर्मा