पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २५ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. कुटुंबात सुख- शांती नांदेल.  कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात.  खर्चात वाढ होईल. वडिलांचं सहकार्य लाभेल, आईकडून पैशांची  मदत होऊ शकते. 

वृषभ -  मनात नकारात्मक विचार येतील. स्वत:वर नियंत्रण ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. जुन्या मित्राच्या मदतीमुळे नोकरीची संधी प्राप्त होईल.  

मिथुन -  बोलताना संयम बाळगा. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचं सहकार्य प्राप्त होईल. नोकरीत कठीण प्रसांगाचा सामना करावा लागेल. 

कर्क - मन अशांत राहिल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन सुखाचा लाभ होईल. स्वत:च्या तब्येतीला जपा. यात्रेला जाण्याचा योग  आहे.  नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. 

सिंह - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आई- वडिलांचे सहकार्य लाभेल. मित्रांची मदत होईल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. 

कन्या -  आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  रागाचा अतिरेक टाळा.  मित्राच्या मदतीनं गुंतवणूक कराल. वडिलांच्या तब्येतीला जपा. खर्चात वाढ होईल. 

तूळ - जोडीदारास आरोग्याची समस्या जाणवेल. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण जाणवेल. कौटुंबीक अडचणींना समोरं जावं लागेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

वृश्चिक - स्वत:वर ताबा ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. वाहन सुखात वाढ होईल. व्यर्थ वादविवाद टाळा. जोडीदारास आरोग्याच्या समस्या जाणवतील. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.

धनू - पाठ- पठनात रुची वाढेल. रागाचा अतिरेक टाळा. बोलताना संयम ठेवा. मित्राचं सहकार्य लाभेल. शैक्षणिक कार्यात सफलता मिळेल.  मुलांकडून गोड वार्ता समजेल. 

मकर - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. कुटुंबात वाद विवाद होण्याची शक्यता.  भावनांना आवर घाला.  नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ -  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल. भावंडांसोबत वैचारिक मतभेद संभवतील. मुलांना  आरोग्याची समस्या जाणवेल. पर्यटनाला जाण्याचा योग येईल. 

मीन - कामात उत्साह  जाणवेल. आत्मविश्वासाची कमी  वाटेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. राहणीमान अधिक कष्टदायी होईल.  

पं. राघवेंद्र शर्मा