पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २४ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र स्वभाव चिडचिडा राहिल.  आईच्या तब्येतीची काळजी घ्या. धार्मिक कार्यात रुची वाढेल. 

वृषभ -  मनासिक तणाव जाणवेल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. जोडीदाराची  तब्येत सुधारेल.  स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा, नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे.

मिथुन - आशा-निराशा मिश्रित दिवस असेल. मानसिक तणाव जाणवेल. उत्पन्न वाढेल मात्र खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. 

कर्क - आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  मानसिक तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल. भावना नियंत्रणात ठेवा. 

सिंह - मनात निराशेचा किंवा असंतोषाचा भाव राहिल. नोकरीत इच्छेविरुद्ध एखादी जबाबदारी मिळेल. खर्चात वाढ होईल. रागाचा अतिरेक टाळा. 

कन्या - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

तूळ - आत्मविश्वास भरपूर वाढेल. कामाचा उत्साह वाढेल. कला आणि संगितात रुची वाढेल. मित्रांचं सहकार्य लाभेल. कौटुंबीक  जीवन सुखकारक असेल. 

वृश्चिक - मन अशांत  राहिल. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या उद्भवतील.  स्वभाव हट्टी राहिल. कुटुंबात सुख- शांती राहिल. 

धनू - पाठ- पठणात रुची वाढेल. मानसिक शांती राहिल. आईचे सहकार्य लाभेल. मित्रांच्या मदतीनं आर्थिक समस्या सोडवाल. जोडीदाराच्या तब्येतीला जपा. 

मकर - मन  अशांत राहिलं. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मनावर दडपण येईल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. 

कुंभ - कामाच्या ठिकाणी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. मानसिक शांती राहिल. भावंडांचं सहकार्य लाभेल.  अधिक कष्ट घ्यावे लागतील. 

मीन - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल. एखाद्या गोष्टींचा ताण जाणवेल. उत्पन्नात वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा