पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १८ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - मन अस्थिर राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल.  आईसोबत काही काळ घालवता येईल. 

वृषभ - स्वत:वर नियंत्रण ठेवा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कौटुंबिक समस्यांचा मनावर परिणाम होईल.

मिथुन - आशा- निराशेचा दिवस असेन. जुन्या मित्राच्या सहकार्यानं धनलाभ होऊ शकतो. 

कर्क - मनाला शांती लाभेल, मन प्रसन्न राहिल. आत्मविश्वास वाढेल.  नोकरीत  सहकाऱ्यांची चांगली साथ लाभेल. 

सिंह - मन अशांत राहिल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कामात काही अतिरिक्त जबाबदारी मिळेल. 

कन्या - आज बोलण्यात कठोरता जाणवेल. बोलताना संयम ठेवा. कामात काही कठीण प्रसंग ओढावू शकतो.

तूळ -  आत्मविश्वासात कमी जाणवेल. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आईची प्रकृती बघडू शकते. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिक - स्वत:वर संयम ठेवा. भावनांना आवर घाला. परिवाराचं सहकार्य मिळेल. तब्येतीला जपा.

धनू -  खर्चात वाढ होईल. धर्मकार्यात रुची वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर - आत्मविश्वासात कमी जाणवेल. चटकन राग येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्चात वाढ होईल.

कुंभ - नोकरीसाठी स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळेल. इतरांचे सहकार्य लाभेल.

मीन - संवाद साधताना संयमानं घ्या. काही कौटुंबिक समस्या मन अस्थिर करतील. कामात काही कठीण प्रसंगांना समोर जावं लागेल.

पं. राघवेंद्र शर्मा