पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १२ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. आईचा सहवास लाभेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.

वृषभ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. राहणीमान अव्यवस्थित राहिल. खर्च अधिक होईल.

मिथुन - मन अशांत राहिल. मानसिक तणावही जाणवू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो.

कर्क - आत्मविश्वासत वाढ होईल. कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. तरीही नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचे प्रभाव राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. धार्मिक संगीताप्रती आवड निर्माण होऊ शकते.

तूळ - आत्मसंयत राहा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाला गती मिळू शकते.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. कपड्यांवर खर्च कराल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. वाणीवर कठोरतेचा प्रभाव जाणवू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

मकर - मन अशांत राहिल. राग अधिक जाणवेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू प्राप्त होऊ शकतात.

कुंभ - शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील.

मीन - वाणीत सौम्यता राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. राहणीमान कष्टमय राहिल. खर्चांत वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा