पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ११ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. धार्मिक कार्यात व्यग्र रहाल. अधिक कष्ट करावे लागतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. आत्मविश्वास राहिल. 

वृषभ - बोलताना संयम ठेवा. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मुलांना आरोग्याचे विकार होतील. वाहन सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. 

मिथुन - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. मानसिक तणाव राहिल. मन अशांत राहिल. जास्त खर्च झाल्याने चिंतेत रहाल. आईकडून पैसे मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - मनात आशा-निराशा असे भाव राहतील. घर सुखात वाढ होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. बोलण्यात सौम्यता राहिल. धैर्यशीलता कमी होईल. खर्च वाढेल. 

सिंह - मानसिक शांती राहिल. मात्र आत्मविश्वास कमी होईल. भावांच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार होईल. फायदा होईल. शैक्षणिक कामात यश मिळेल. खर्च वाढेल. 

कन्या - मन अशांत राहिल. क्षणात आनंदी-क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आत्मविश्वास कमी होईल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. उत्पन्नात वाढ होईल. 

तूळ - आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. कला आणि संगीताकडे कल वाढेल. आईकडून पैसे मिळू शकतात. मित्राच्या मदतीने व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक - आरोग्याची काळजी घ्या. रागाचा अतिरेक टाळा. बोलताना संयम ठेवा. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

धनू - आत्मसंयम ठेवा. कुटुंबात तणावाचे वातावरण राहिल. मन अशांत राहिल. जास्त खर्च झाल्याने चिंतत रहाल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मकर - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन त्रासदायक होईल. घरांच्या देखभालीसाठी खर्च वाढेल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. मात्र आत्मविश्वास कमी होईल. आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मीन - कला आणि संगीताकडे कल राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. भावंडांचे सुख कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. 

पं. राघवेंद्र शर्मा