पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ५ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. सुख-सुविधांचा विस्तार होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ - कला आणि संगीतप्रती आवड निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहिल. परंतु, उत्पन्न कमी होईल.

मिथुन - मन अशांत राहिल. पठन-पाठनात रुची राहिल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क - आशा-निराशेचे मिश्रित भाव मनात राहतील. शैक्षणिक कार्यांत अडचणी येतील. मित्रांबरोबर प्रवासाला जाण्याची शक्यता.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. पठन-पाठनात आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. आरोग्याप्रती सावध राहा.

कन्या - मानसिक तणाव राहिल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. आईची साथ मिळेल. घरात धार्मिक कार्य होऊ शकते.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कौटुंबिक सुखात कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहिल. अधिक कष्ट करावे लागतील.

वृश्चिक - कपड्यांप्रती आवड निर्माण होईल. वडिलांना आरोग्याच्या समस्या भेडसावतील. खर्चांत वाढ होईल. संचित धन वाढेल.

धनू - आत्मविश्वासात वाढ होईल. पठन-पाठनात रुची वाढेल. नोकरीसाठी स्पर्धा परिक्षेत आणि मुलाखतीत यश मिळेल.

मकर - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. कौटुंबिक सुखात वाढ होईल. निवासस्थानाच्या सजावटीवर खर्च वाढू शकतो. दाम्पत्य सुखात वाढ होईल.

कुंभ - वाहन सुखात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी बढतीची शक्यता. कामाचा भार वाढेल. अधिक कष्ट करावे लागतील.

मीन - क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव मनात असतील. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चांत वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

- पं. राघवेंद्र शर्मा, मुंबई