पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ०३ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - दाम्पत्य सुखात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. खर्च अधिक, उत्पन्न कमी. आईकडून धन प्राप्तीचे योग.

वृषभ - आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन - मानसिक तणाव राहिल. मन अशांत राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. जुन्या मित्रांची भेट होईल. उत्पन्न कमी, खर्च अधिक राहिल.

कर्क - आत्मविश्वास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह - एखाद्या राजकीय नेत्याची भेट होईल. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. पदोन्नतीची संधी मिळेल. 

कन्या - आत्मविश्वास कमी असेल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. मन अशांत राहिल.

तूळ - धैर्यशीलता कमी असेल. क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव असतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीत बदलीची शक्यता.

वृश्चिक - मानसिक त्रास जाणवेल. प्रवास लाभदायक ठरेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. खर्च वाढेल.

धनू - धैर्यशीलता कमी राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आईचा सहवास लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल.

मकर - मनात प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वास कमी राहिल. आत्मसंयत राहा. उत्पन्न कमी खर्च अधिक असेल.

कुंभ - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. लाभाची संधी. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मीन - संयत राहा. धैर्यशीलता कमी राहिल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. 

पं. राघवेंद्र शर्मा