पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २६ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -   धार्मिक कार्यात रुची वाढेल. मन अशांत राहिल, आत्मविश्वास भरपूर राहिल. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल मात्र उत्पन्नही वाढेल. 

वृषभ - मन अशांत राहिल. मित्रांचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल आणि उत्पन्नात घट होईल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. 

मिथुन - बोलताना संयम ठेवा. कला आणि संगीतात रुची वाढेल.  तब्येतीची काळजी घ्या. घरात धार्मिक कार्य संभवेल. 

कर्क - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. मन अशांत राहिल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. मित्राचं सहकार्य प्राप्त होईल.

सिंह - आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  कामाच्या ठिकाणी  कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. मनात निराशेचा किंवा असंतोषाचा भाव राहिल. गोड खाण्यात रुची वाढेल.

कन्या - वडिलांच्या तब्येतीला जपा. रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. घरात धार्मिक कार्य संभवतील.

तूळ - कुटुंबात सुख शांती नांदेल. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. स्वभाव चिडचिडा राहिल. मित्राचं सहकार्य प्राप्त होईल. 

वृश्चिक - बोलताना संयम  बाळगा. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. स्वभाव हट्टी राहिल. भावंडांचं  सहकार्य लाभेल. 

धनू - मन अशांत राहिल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद संभवतील. खर्चात वाढ होईल. 

मकर - मन अशांत राहिल. आळशीपणा जाणवेल. संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ -  मन अशांत राहिल. खर्चात वाढ होईल.  आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत परीवर्तनाची शक्यता. मेहनत अधिक करावे लागेल.

मीन - क्षणाक्षणाल स्वभावात बदल होतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. मानसिक ताण जाणवेल. मित्राची भेट  होण्याची शक्यता आहे.

पं. राघवेंद्र शर्मा