पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | ५ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता. आईला एखादा आजार होऊ शकतो.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. भौतिक सुखात वाढ होईल. लेखनातून उत्पन्नप्राप्तीचे योग.

मिथुन - शैक्षणिक कामात अडचणी येतील. नोकरीमध्ये एखादी विशेष जबाबदारी मिळेल. कौटुंबिक सुखात कपात होईल.

कर्क - शैक्षणिक कामात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी एखाद्या अन्य ठिकाणी जावे लागेल. अनियोजित खर्चात वाढ.

सिंह - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. भावा-बहिणीचे सान्निध्य लाभेल.

कन्या - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करू शकतात. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल. अधिक कष्ट करावे लागतील.

तूळ - मनात शांतता आणि प्रसन्नता राहिल. कला आणि संगीत याची रुची वाढेल. मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. संततीकडून सुखद बातमी हाती येईल. कुटुंबासोबत यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

धनू - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वास्तूच्या देखभालीवर आणि सजावटीवर खर्च होईल.

मकर - एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. अनियोजित खर्च वाढेल. कुटुंबात अशांतता राहू शकते. 

कुंभ - आत्मसंयम बाळगा. धैर्यशीलता कमी होईल. एखाद्या मित्राच्या साथीने नोकरीची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

मीन - तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेवर जाण्याचे योग आहेत. संततीला त्रास होईल.

पं. राघवेंद्र शर्मा