पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | ५ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास राहिल. मानसिक शांती मिळेल. मुलांना त्रास होईल. मित्राच्या मदतीने व्यवसायाची संधी मिळेल. 

वृषभ - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होईल. खर्च वाढेल. गोड खाण्याकडे कल वाढेल. 

मिथुन - एखाद्या अज्ञात भितीने चिंतेत रहाल. पैशांची स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. 

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मानसिक तणाव राहिल. धार्मिक कार्यात खर्च वाढेल. 

सिंह - वाचनात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. बहिण-भावांच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होईल. 

कन्या - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. घरात धार्मिक कार्य होतील. भौतिक सुखात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

तूळ - मन अशांत राहिल. बोलताना संयम ठेवा. कुटुंबातील वयोवृध्द व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. भावांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. भांडण टाळा. 

धनू - शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्राच्या सहकार्याने उत्पन्नाचे साधन मिळू शकते. कला आणि संगिताकडे कल राहिल. 

मकर - राग जास्त येईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. 

कुंभ - मन प्रसन्न राहिल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

मीन - आरोग्याची काळजी घ्या. वाहन सुखात वाढ होईल. कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. 

पं. राघवेंद्र शर्मा