पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २७ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. मन अशांत राहिल. मनात नकारात्मक विचार येतील. रागावर नियंत्रण ठेवा. धार्मिक ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा योग. 

वृषभ -  जुन्या थकबाकी वसूल होतील. नोकरीत प्रगतीची संधी आहे. मानसिक शांती लाभेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. कौटुंबीक समस्येमुळे मन चिंतेत असेल.

मिथुन - वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अज्ञात भीतीनं मन चिंतेत असेल.  जुन्या मित्रांसोबत पर्यटनाला जाण्याचा योग येईल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.  कठीण प्रसंगांना समोरं जावं लागेल.  

कर्क -  आशा- निराशा मिश्रीत भाव राहिल.  बोलताना संयम बाळगा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. खर्चात वाढ होईल. 

सिंह -  आत्मविश्वास भरपूर जाणवेल.  मानसिक शांती प्राप्त होईल.  मनात नकारात्मक विचार येतील. मित्रांचं सहकार्य लाभेल. पर्यटनाला जाण्याचा योग आहे. 

कन्या -  आशा-निराशा मिश्रीत दिवस असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कपड्यांच्या खरेदीकडे कल वाढेल. नेत्याशी भेट होण्याचा संभव. मनात नकारात्मक विचार येतील.

तूळ - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडेल.  

वृश्चिक - मानसिक शांती लाभेल.  मात्र बोलताना  संयम बाळगा. नोकरीत परिवर्तनाची शक्यता. नोकरीत चांगली  संधी प्राप्त होऊ शकते.  

धनू -  तटस्थ रहा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल.  खर्चात वाढ होईल, उत्पन्न मात्र घटेल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर येईल. अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

मकर - जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. साठवलेल्या पैशांची कमी जाणवेल. 

कुंभ - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  मनात नकारात्मक भाव येतील. नोकरीत परीवर्तनाची शक्यता. 

मीन - मित्रांसोबत पर्यटनाला जाण्याचा योग प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. धर्माप्रती श्रद्धाभावर राहिल. यात्रेला जाण्याचा योग येईल.  

पं. राघवेंद्र शर्मा