पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २५ जुलै २०१९

राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. कौटुंबिक स्थिती सुधारेल. नोकरीमध्ये परगावी जाण्याचे योग

वृषभ - मनात अशांतता राहिल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. छोट्या भावा-बहिणीशी वैचारिक वाद होतील.

मिथुन - मानसिक तणाव कमी होऊ शकेल. तरीही बोलताना संयम बाळगा. आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. काही जुन्या मित्रांची भेट होईल. गोड खाण्या-पिण्याची आवड वाढेल. खर्च अधिक होईल.

सिंह - मनात अशांतता राहिल. आई-वडिलांना एखादा आजार होऊ शकतो. नोकरीमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.

कन्या - धैर्यशीलपणा कमी होईल. बोलताना संयम बाळगा. बोलताना कठोर शब्द वापरले जाऊ शकतात. जुन्या मित्राची भेट होईल.

तूळ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव राहतील. आईशी वैचारिक मतभेद होतील. धनप्राप्ती होऊ शकते.

वृश्चिक - जप-तप करण्यात रुची वाढेल. मनात नकारात्मक विचार येतील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. 

धनू - शैक्षणिक कामात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. उत्पन्न कमी होईल.

मकर - कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाचे योग आहेत. खर्च अधिक होईल.

कुंभ - कुटुंबात धार्मिक कार्य होईल. वाहनसुखात घट होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यावसायिक स्थितीत सुधारणा होईल.

मीन - धर्माबद्दल मनात श्रद्धाभाव राहिल. आईला एखादा आजार होईल. आरोग्यावरील खर्चात वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा